अत्याचारप्रकरणी आरोपी कर्मचारी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 02:53 AM2017-07-22T02:53:02+5:302017-07-22T02:53:02+5:30

मनोरुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिपिंगही बनवल्याचा

Attempted accused accused in torture | अत्याचारप्रकरणी आरोपी कर्मचारी अटकेत

अत्याचारप्रकरणी आरोपी कर्मचारी अटकेत

Next

मनोरुग्णालयातील घटना : अल्पवयीन मुलीचे प्रकरण, व्हिडिओ क्लिपिंगही बनवली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनोरुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने अनाथ अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून त्याची व्हिडिओ क्लिपिंगही बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. १४ जुलै रोजी ही घटना घडली. या प्रकरणामुळे पोलीस आणि मनोरुग्णालयातील अधिकारी हादरले आहेत. लोकेश घनश्याम गंगाहेडे (३४) रा. न्यू वाल्मिकी कॉलनी इमामवाडा असे आरोपीचे नाव आहे. शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.
पोलीस सूत्रानुसार १२ ते १४ वर्षीय पीडित अल्पवयीन मुलगी ही श्रद्धानंदपेठ अनाथालयात राहते. तिला मनोरुग्णालयात दाखल करण्यात आले होते. १९ जुलै रोजी तिला सुटी मिळली होती. तेथून अनाथालयात परत आल्यानंतर २० जुलै रोजी अल्पवयीन मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याचे सांगितले. पोलीस सूत्रानुसार अल्पवयीन मुलीचे म्हणणे आहे की, १४ जुलै रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ५ या दरम्यान तिच्यावर बाथरूममध्ये अत्याचार करण्यात आला. तसेच तिची व्हिडिओ क्लिपिंग बनवण्यात आली.
काठीने तिला मारहाण करून याबाबत कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली. अल्पवयीन मुलीकडून अत्याचाराचे ऐकून अनाथालयातील अधिकाऱ्यांनाही धक्का बसला. त्यानी महिला समुपदेशक समितीला तातडीने सूचना दिली. समितीतर्फे विचारपूस केली असता अल्पवयीन मुलीने तिच्यावर झालेला प्रसंग पुन्हा सांगितला. या आधारावर गुरुवारी सायंकाळी मानकापूर पोलिसांना सूचना देण्यात आली. मनोरुग्णालयात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच मानकापूर पोलीसही हादरून गेले. त्यांनी लगेच लोकेशला ताब्यात घेतले. त्याने अत्याचार केल्याचे नाकारले आहे. लोकेशचे म्हणणे आहे की, तो दुपारच्या वेळी आपल्या साथीदारांसह मेसमध्ये जेवण बनवण्यासाठी जातो. सर्व सोबतच ये-जा करतात. खुल्या परिसरात अशा प्रकारचे कृत्य होऊन कुणालाही माहीत न होणे शक्य नाही.
लोकेशने अल्पवयीन मुलीने सांगितलेला मोबाईलसुद्धा आपल्याकडे नसल्याचे सांगितले आहे. लोकेशला विचारपूस केल्यावर पोलीसही चक्रावून गेले आहेत. तो दीड वर्षापूर्वीच कामावर लागला होता. तो रुग्णांना जेवण वाढण्याचे काम करतो.

Web Title: Attempted accused accused in torture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.