देशात भाजपविरोधी वातावरण : सुरेश माने 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 09:29 PM2018-10-13T21:29:58+5:302018-10-13T21:32:23+5:30

देशात भाजपविरोधी मत आहे. त्यांना सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी अनेक पक्ष एकमेकांच्या सोबत येण्यास तयार आहे. यासाठी मोठे समीकरण तयार करावे लागेल. काँग्रेस मोठा पक्ष असून निवडणुकीत त्यांनाच मोठा फायदा होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊन समीकरण तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे (बीआरएसची) अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी व्यक्त केले.

Anti-BJP atmosphere in the country: Suresh Mane | देशात भाजपविरोधी वातावरण : सुरेश माने 

देशात भाजपविरोधी वातावरण : सुरेश माने 

Next
ठळक मुद्देविरोधी पक्षांना एकजूट करण्याची जबाबदारी काँग्रेसची

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात भाजपविरोधी मत आहे. त्यांना सत्तेतून बाहेर घालविण्यासाठी अनेक पक्ष एकमेकांच्या सोबत येण्यास तयार आहे. यासाठी मोठे समीकरण तयार करावे लागेल. काँग्रेस मोठा पक्ष असून निवडणुकीत त्यांनाच मोठा फायदा होणार असल्याने सर्वांना सोबत घेऊन समीकरण तयार करण्याची जबाबदारी काँग्रेसची असल्याचे मत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे (बीआरएसची) अध्यक्ष अ‍ॅड. सुरेश माने यांनी व्यक्त केले.
रविभवन येथे निवडक पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, ‘भाजपला सत्तेतून बाहेर काढणे आवश्यक आहे. पक्षाला होत असलेल्या तीन वर्षाच्या माध्यमातून ठिकठिकाणी परिषदा घेऊन त्याची तयारी करण्यात येत आहे.
‘लोकसभा निवडणुकीत बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पक्ष महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये उमेदवार उभे करणार आहे. मात्र याचा फायदा भाजपला होणार नाही, याची काळजी घेण्यात येईल. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांशी चर्चा झाली असून आघाडी करण्यासंदर्भात कुठलाही निर्णय झालेला नाही’, असे त्यांनी सांगितले. वंचित बहुजन आघाडीत प्रकाश आंबेडकर हे इतर कोणालाही सामील करण्यास तयार नाहीत. त्यामुळे त्यांच्या सोबत जाण्याचा प्रश्नच नाही, असे ते म्हणाले.

Web Title: Anti-BJP atmosphere in the country: Suresh Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.