देशी बियाण्यांसोबत पशुसंवर्धनही 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 01:19 AM2018-04-08T01:19:24+5:302018-04-08T01:19:35+5:30

Animal Breeding with Indigenous Seeds | देशी बियाण्यांसोबत पशुसंवर्धनही 

देशी बियाण्यांसोबत पशुसंवर्धनही 

googlenewsNext
ठळक मुद्देबीजोत्सव : पारंपरिक पशुपालकांनाही मिळाले हक्काचे व्यासपीठ

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : म्युर मेमोरियल रुग्णालयाच्या परिसरात सुरू असलेल्या बीजोत्सवात देशी बियाण्यांच्या संवर्धनासोबतच यंदा देशी पशुसंवर्धनाचाही संदेश देण्यात आलेला आहे. यासाठी पारंपरिक पशुपालन करणाऱ्या पिढीची नागरिकांना ओळख व्हावी, या उद्देशाने त्यांनाही यंदा हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. बीजोत्सवातील या प्रदर्शनात वर्धेतील प्रसिद्ध गौळाऊ गाय, नागपुरी म्हैस, गुजरातची देशी गीर आकर्षणाचे केंद्र ठरले आहे.
देशी बियाण्यांचा वापर वाढावा, यासाठी सुरू करण्यात आलेल्या बीजोत्सवाचे हे ६ वे वर्ष आहे. यंदा एक पायरी पुढे जाऊन पारंपरिक पशुपालन करणाºया समाजालाही यात सामील करण्यात आले आहे. आपल्या देशात पशुपालन करणारे काही ठराविक समाज आहे. ते केवळ दूधासाठीच पशुपालन करत नाहीत तर पशुपालन ही त्यांची संस्कृती आहे. पशुपालनातून ते दूध, शेती व खत निर्माण करीत असतात. उदाहरणार्थ नंदागवळी समाज हा गौळाऊ गाईंचे पालन करतो. गुजरातचे भारवाड समाज हे देशी गीर गाईंचे पालन करतात. रबारी समाज काँग्रेज गाय, माना, धनगर आदिवासी समाज हे शेळी मेंढी पालन करतात. पारंपरिक पद्धतीने हा समाज पशुपालन करीत आला आहे. पशुपालन ही त्यांची संस्कृती आहे. त्यामुळे शेती आणि अन्नधान्य सुरक्षिततेमध्ये या समाजाचा मोठा वाटा राहिलेला आहे. शहरातील नागरिकांना याची माहिती व्हावी, या उद्देशाने बीजोत्सवात या समाजातील काही नागरिकांना आमंत्रित करण्यात आले आहे. प्रदर्शनात या पारंपरिक देशी पशुंचा एक स्वतंत्र स्टॉल नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. यात गौळाऊ गाय, नागपुरी म्हैस, देशी गीर, शेळी यांच्यासह उंटही नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
गौळाऊ गाय ही अतिशय प्रसिद्ध आहे. तिला ‘विदर्भाची शान व वर्धेची माय’ असेही म्हटले जाते. ही गाय मुख्यत: आर्वी, आष्टी व कारंजा या भागात मोठ्या प्रमाणावर आढळून येते. गौळाऊ गाईपासून तयार होणाºया तुपाला प्रचंड मागणी आहे. या गाईचे दूध ए-२ आहे. आयुर्वेदात याला मोठी मागणी आहे. लोमेश्वर आसोले हे स्वत: गौळाऊ गाईचे तूप काढतात. हा शुद्ध तुपाचा स्टॉलही बीजोत्सवाचे आकर्षण ठरले आहे. यासोबतच आम्ही आमच्या आरोग्यासाठी, लाल अंबाडीचे सरबत आदींचेही स्टॉल लक्ष वेधून घेत आहेत.

Web Title: Animal Breeding with Indigenous Seeds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.