बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापराल तर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2019 11:04 AM2019-05-18T11:04:22+5:302019-05-18T11:06:02+5:30

शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे.

Action will be taken if drinking water is used for construction | बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापराल तर कारवाई

बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापराल तर कारवाई

Next
ठळक मुद्देमनीषनगरात कनेक्शन खंडितजलप्रदाय विभागाकडून गंभीर दखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहराला पाणीपुरवठा होणाऱ्या जलाशयात मर्यादित साठा आहे. याचा विचार करता जलप्रदाय विभागाने पिण्याच्या पाण्याचा बांधकामासाठी वापर करणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशरा दिला असून अमंलबजावणीही सुरू केली आहे. मनीषनगर येथील जय दुर्गा सोसायटीत राहणाऱ्य एका ग्राहकाने पिण्याचे पाणी बांधकामासाठी वापरल्याने त्याचे नळकनेक्शन खंडित केले आहे. कनेक्शन पुन्हा जोडावयाचे असल्यास आधी व्यावसायिक दरानुसार पाणीकर भरावा लागणार आहे.
टिल्लू पंप वापरणाऱ्यावर कारवाई
महापालिका आणि जलप्रदाय विभागाने टिल्लू पंपाचा बेकायदेशीर वाापर करणाऱ्याच्या विरोधात कायदेशीर कारवाई आणि नळ कनेक्शन खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. बुस्टर पंपाचा वापर महापालिकेच्या पाणी उपविधीनुसार दंडनीय गुन्हा आहे. दोषीवर त्यानुसार कारवाई केली जाईल. कारवाई टाळण्यासाठी नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा गैरवापर टाळावा, असे आवाहन जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.
पाणी बचतीसाठी मनपाचे आवाहन
कूलरमध्ये पिण्याच्या पाण्याऐवजी विहिरीच्या पाण्याचा वापर करा.
गाड्या धुण्यासाठी विहीर, बोअरवेलचे पाणी वापरा.
बांधकामासाठी पाण्याचा पुनर्वापर किंवा इतर पाणी वापरा.
नळाला तोट्या लावा, घरातील नळांना गळती असल्यास बंद करा.
जलवाहिनीवर गळती आढळल्यास मनपाला कळवा.
पाण्याचा गैरवापर होत असल्यास मनपाकडे तक्रार करा.

Web Title: Action will be taken if drinking water is used for construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.