नियमांचे पालन न करणाऱ्या पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2018 12:24 AM2018-09-04T00:24:29+5:302018-09-04T00:27:42+5:30

पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत्यांनी फलक विक्री ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या पीओपी मूती विक्रे त्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिला आहे.

Action on POP idol dealers who did not follow the rules | नियमांचे पालन न करणाऱ्या पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

नियमांचे पालन न करणाऱ्या पीओपी मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

Next
ठळक मुद्देअतिरिक्त आयुक्तांचा इशारा : स्वयंसेवी संस्थांच्या बैठकीत नियमांचे पालन करण्याची ग्वाही

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत्यांनी फलक विक्री ठिकाणी लावणे बंधनकारक आहे. नियमाचे पालन न करणाऱ्या पीओपी मूती विक्रे त्यांवर कारवाई केली जाईल, असा इशारा महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी दिला आहे.
गणेशोत्सव तयारीच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत महापालिका मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती सभागृहात नुकत्याच आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी उपायुक्त नितीन कापडणीस, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार व स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
अझीझ शेख पुढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने नेहमीच पुढाकार घेत असते. यात स्वयंसेवी संस्थांचा वाटा मोठा आहे. जनजागृती करण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था दरवर्षी करतात. निर्माल्य संकलन, जलप्रदूषण होऊ नये म्हणून पीओपीच्या मूर्तीचे विसर्जन कृत्रिम तलावातच व्हावे. यासाठी स्वयंसेवी संस्था करीत असलेले प्रयत्न आणि मदत मोलाची आहे. पीओपी मूर्तीसंदर्भात कारवाईसाठी यंदा उपद्रव शोधपथक तैनात असेल. प्रत्येक विक्रेत्यांकडे जाऊन नियमांची अंमलबजावणी होत आहे की नाही याबाबत ते खातरजमा करतील. नियमांचे उल्लंघन करणाºयांवर दंडात्मक कारवाई करतील, असेही शेख म्हणाले.
प्रदीप दासरवार यांनी यंदा शहरात ठेवण्यात येणाºया कृत्रिम तलाव आणि विसर्जनासंदर्भात माहिती दिली. शुक्रवारी तलाव, सक्करदरा तलाव आणि सोनेगाव तलाव याही वर्षी विसर्जनासाठी बंद असून या तलाव परिसरात कृत्रिम तलाव तयार करण्यात येत आहे.
ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी यांनी पीओपी मूर्तीच्या मुद्यावर मत मांडले. फुटाळा येथे ग्रीन व्हिजीलचे संपूर्ण स्वयंसेवक दहाही दिवस सेवा देतात. मात्र, पीओपी मूर्तींवर नियमाप्रमाणे खूण नसल्याकारणाने अडचणीचे होते. त्यामुळे पीओपीसंदर्भातील नियमांची कडक अंमलबजावणी करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. विसर्जनादरम्यान तलावांवर अनेक असामाजिक तत्त्वांचा वावर असतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांना अडचणींचा सामना करावा लागतो. अशा असामाजिक तत्त्वांवर अंकु श लावण्याची सूचनाही यावेळी करण्यात आली.
सुरभी जैस्वाल यांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवासंदर्भातील जनजागृती स्मार्ट सिटी स्क्रीन आणि सोशल मीडियावरून करण्याची सूचना केली.
बैठकीला ग्रीन व्हिजील फाऊंडेशनचे कौस्तभ चॅटर्जी, सुरभी जैस्वाल, मेहुल कोसुरकर, कल्याणी वैद्य, रोटरी क्लब आॅफ नागपूरच्या डॉ. दीपा जैस्वाल, अंजली मिनोहा, अरण्य पर्यावरण संस्थेचे प्रणय तिजारे, अभिजित लोखंडे, रोटरी क्लब आॅफ नागपूर व्हिजनचे दिनेश नायडू, रोटरी क्लब आॅफ नागपूर मिहान टाऊनचे हरीश अडतिया, मंजूषा चकनलवार, किंग कोब्रा युथ फोर्सचे अरविंदकुमार रतुडी, संजय पंचभाई, निसर्ग विज्ञान मंडळचे डॉ. विजय घुगे, दीपक शाहू, डी.ई. रंगारी, वृक्ष संवर्धन समितीचे बाबा देशपांडे, जनजागृती आव्हान बहुउद्देशीय समितीचे प्रदीप हजारे, मिलिंद टेंभुर्णीकर, निखिलेश शेंडे, पीओपी मूर्तीविरोधी कृती समितीचे नितीन माहुलकर, चंदन प्रजापती, हरित शिल्पी बहुउद्देशीय संस्थेचे सुरेश पाठक आदी उपस्थित होते.

मातीच्या मूर्तीचे स्वतंत्र मार्के ट करा
पीओपी मूर्तीवर अंकुश आणण्यासाठी महापालिकेने मातीच्या मूर्ती विक्रीसाठी झोननिहाय स्वतंत्र मार्के ट तयार करण्याची सूचना रोटरी क्लबच्या प्रतिनिधींनी केली. फुटाळा आणि अन्य काही ठिकाणी कृत्रिम तलावांची संख्या वाढविण्याची सूचना केली. कृत्रिम टँक हे पहिल्या दिवसापासूनच ठेवावे, अशी सूचना प्रतिनिधींनी केली.

 

Web Title: Action on POP idol dealers who did not follow the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.