80 crores fund for second phase loan waiver in Nagpur district | नागपूर जिल्ह्यात कर्जमाफीसाठी दुसऱ्या  टप्प्यात ८० कोटींचा निधी

ठळक मुद्देपहिल्या टप्प्यात मिळाले ९६ कोटी

आॅनलाईन लोकमत
नागपूर : शेतकरी कर्जमाफी अंतर्गत शासनाकडून पहिल्या टप्प्यात नागपूर जिल्ह्यातील २४९० शेतकऱ्यांसाठी ९६ कोटींचा निधी मिळाला होता. आता दुसऱ्या टप्प्यात ८० कोटींचा निधी मिळाला आहे. हा संपूर्ण निधी एनडीसीसी बँकेला मिळाला असून राष्ट्रीयकृत बँकांना अद्याप निधी मिळाला नसल्याची माहिती आहे.
शासनाने दीड लाख रुपयेपर्यंतची सरसकट रक्कम माफ करण्यासोबत दीड लाखावरील रक्कम भरल्यास या कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. नागपूर जिल्ह्यात १ लाख १० हजारांवर शेतकऱ्यांनी आॅनलाईन अर्ज केला होता. यात एनडीसीसी बँकतील ३५ हजारांवर कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश असल्याची माहिती आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात जवळपास ८० कोटींचा निधी एनडीसीसी बँकेला मिळणार आहे. यात ६ हजार ९०० वर शेतकऱ्यांसाठी ४२ कोटींची रक्कम आहे. या सर्व शेतकऱ्यांकडे दीड लाखापर्यंतचे कर्ज थकीत असल्याची माहिती आहे. त्याचप्रमाणे ३९ हजार कोटींच्यावर रक्कम ही दीड लाखापेक्षा जास्त कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी आहे. यांची संख्या सहा हजारांच्यावर आहे.