नागपुरात एका गाडीवर २२६ दवाखान्यांच्या कचऱ्याचा भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 09:22 PM2018-08-08T21:22:32+5:302018-08-08T21:24:11+5:30

मध्य भारतातील वैद्यकीय ‘हब’ म्हणून उपराजधानीची ओळख असून, हजारो दवाखाने येथे आहेत. दररोज या दवाखान्यांमधून हजारो किलोंचा ‘बायोमेडिकल’ कचरा बाहेर निघतो. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. मात्र प्र्रत्येक गाडीवर सुमारे २२६ दवाखान्यांचा भार आहे. अशास्थितीत खरोखरच दररोज सर्व दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

226 dispensaries of garbage load on a vehicle in Nagpur | नागपुरात एका गाडीवर २२६ दवाखान्यांच्या कचऱ्याचा भार

नागपुरात एका गाडीवर २२६ दवाखान्यांच्या कचऱ्याचा भार

Next
ठळक मुद्देसर्व दवाखान्यातील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलला जातोय का? : मनपाने दिले आहे खासगी कंपनीला कंत्राट

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य भारतातील वैद्यकीय ‘हब’ म्हणून उपराजधानीची ओळख असून, हजारो दवाखाने येथे आहेत. दररोज या दवाखान्यांमधून हजारो किलोंचा ‘बायोमेडिकल’ कचरा बाहेर निघतो. कचरा उचलण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांच्या माध्यमातून हा कचरा उचलण्यात येतो. मात्र प्र्रत्येक गाडीवर सुमारे २२६ दवाखान्यांचा भार आहे. अशास्थितीत खरोखरच दररोज सर्व दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलला जातो का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा करण्यात आली होती. १ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत ‘बायोमेडिकल’ कचरा उचलण्यासाठी नेमलेल्या कंपनीने किती जैविक कचरा उचलला, मनपाला यापासून किती महसूल प्राप्त झाला, कचरा उचलण्यासाठी किती दवाखान्यांशी करार झाले आहेत, नियमांचे पालन न करणाऱ्या किती दवाखान्यांना दंड झाला तसेच कचरा उचलणाऱ्या कंपनीकडे किती गाड्या आहेत, याबाबत त्यांनी प्रश्न उपस्थित केले होते. मनपाच्या आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार, नागपूर शहरात ‘बायोमेडिकल’ कचरा उचलण्यासाठी एकूण २,७१९ दवाखाने किंवा इतर लोकांचे मनपाशी करार झाले आहेत. कचरा उचलण्याचा कंत्राट देण्यात आलेल्या कंपनीकडून १२ गाड्यांमार्फत ही उचल करण्यात येते. याचाच अर्थ एका गाडीवर २२६ दवाखान्यांचा भार आहे. शहराची भौगोलिक स्थिती लक्षात घेता, दररोज एका गाडीवरून इतक्या दवाखान्यांमधील ‘बायोमेडिकल’ कचरा उचलणे शक्य आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

वर्षनिहाय उचलण्यात आलेला कचरा
वर्ष                      कचरा ( मेट्रिक टनमध्ये)                   महसूल (रुपयांमध्ये)
२०१५                     ७१२.६८८                                           ५९,९३,०१७
२०१६                     ८२०.७०१                                           ४४,३१,२२०
२०१७                     ८५५.७१२                                          ३१,२७,९२०
२०१८ (जूनपर्यंत )   ५४४.९८४                                            ८,६०,१७८


मनपाला मिळाला सव्वा कोटींहून अधिक महसूल
१ जानेवारी २०१५ ते ३० जून २०१८ या कालावधीत संबंधित कंपनीने शहरातून २,९३४.०८५ मेट्रिक टन कचऱ्याची उचल केली. सरासरी दररोज शहरांतील दवाखान्यांमधून २.३० मेट्रिक टन ‘बायोमेडिकल’ कचऱ्याची उचल झाली. यासाठी मनपाला कंपनीकडून १ कोटी ४४ लाख १२ हजार ३३५ रुपयांचा महसूल प्राप्त झाला. सर्वाधिक ५९ लाख ९३ हजार १७ रुपयांचा महसूल २०१५ साली प्राप्त झाला होता. या कालावधीत कचरा उचलण्याच्या नियमांचे पालन न केल्याबद्दल डॉ. धांडे यांच्या ‘पॅनोरमा एमआरआय सेंटर’ला २० हजार रुपयांचा दंड करण्यात आला.

कचरा वाढला, महसूल घटला
दरम्यान, २०१५ ते २०१८ या कालावधीत प्रत्येक वर्षी कंपनीकडून कचरा उचलण्याच्या वजनात वाढ झाली आहे. मात्र प्रत्यक्षात मनपाला मिळणारा महसूल दरवर्षी घटत गेला असल्याचे आकडेवारीतून दिसून येत आहे.

 

Web Title: 226 dispensaries of garbage load on a vehicle in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.