नागपूर शहरात डेंग्यूचे २०० रुग्ण : सर्वच इस्पितळांमध्ये रुग्णांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 10:20 PM2018-10-12T22:20:17+5:302018-10-12T22:21:50+5:30

डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालय या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. एकट्या नागपुरात आतापर्यंत २०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलांसोबतच मोठेही या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. एकीकडे डेंग्यूसदृश आजाराने उपराजधानी फणफणली असताना त्या तुलनेत महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. अल्प मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीमुळे डासांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. यातच घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असल्याने करावे काय, असा प्रश्न महानगरपालिकेला पडल्याचे दिसून येत आहे.

200 patients of dengue in Nagpur city: crowd of patients in all hospitals | नागपूर शहरात डेंग्यूचे २०० रुग्ण : सर्वच इस्पितळांमध्ये रुग्णांची गर्दी

नागपूर शहरात डेंग्यूचे २०० रुग्ण : सर्वच इस्पितळांमध्ये रुग्णांची गर्दी

googlenewsNext
ठळक मुद्देसर्वाधिक रुग्ण गांधीबाग झोनमध्ये

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डेंग्यूचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालय या आजाराच्या रुग्णांनी खचाखच भरली आहेत. एकट्या नागपुरात आतापर्यंत २०० वर रुग्णांची नोंद झाली आहे. लहान मुलांसोबतच मोठेही या आजाराच्या विळख्यात सापडली आहेत. एकीकडे डेंग्यूसदृश आजाराने उपराजधानी फणफणली असताना त्या तुलनेत महापालिकेच्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. अल्प मनुष्यबळ, यंत्रसामुग्रीमुळे डासांवर नियंत्रण मिळविणे कठीण झाले आहे. यातच घराघरांमध्ये डेंग्यूच्या अळ्या आढळून येत असल्याने करावे काय, असा प्रश्न महानगरपालिकेला पडल्याचे दिसून येत आहे.
‘एडिस’ डासाच्या चावण्याने होणाऱ्या डेंग्यूने नागपूरकर गारद झाले आहेत. शहरात २०१४ मध्ये सर्वाधिक म्हणजे ६०१ रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर २०१५ मध्ये २३०, २०१६ मध्ये १९५ तर २०१७ मध्ये २०० रुग्ण आढळून आले, असे असताना सुरुवातीपासून महापालिकेने या आजाराला फारसे गंभीरतेने घेतले नाही. यामुळे याचा फटका नागपूरकरांना बसत आहे. त्याचवेळी मनुष्यबळ, अद्यावत यंत्रसामुग्री उपलब्ध करून योग्य पद्धतीने उपाययोजना केल्या असत्या, आणि डेंग्यू डासांच्या अळ्या आढळून येणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली असती तर आज चित्र वेगळे असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आतापर्यंत रुग्णांची संख्या पाहता हा आकडा ४०० वर जाण्याची शक्यता आहे. मनपाच्या झोनअंतर्गत रुग्णांची संख्या पाहिली असता सर्वाधिक रुग्ण गांधीबाग झोनमध्ये आढळून आले आहेत.
 गांधीबागमध्ये ४६ तर लकडगंजमध्ये ३० रुग्ण
महापालिकेच्या गांधीबाग झोनमध्ये आतापर्यंत ४६ रुग्ण आढळून आले आहेत. दाटीवाटीची वसाहत, उघड्या नाल्या, तुंबलेले पाणी यामुळे या भागात सर्वात जास्त रुग्ण दिसून येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दुसऱ्या क्रमांकावर लकडगंज झोन आहे. येथे ३० रुग्णांची नोंद झाली आहे.
मनपाच्या झोननिहाय रुग्ण
गांधीबाग ४६,हनुमाननगर ११,लक्ष्मीनगर १३,धरमपेठ २०,धंतोली ७, नेहरुनगर २५, सतरंजीपुरा १६, लकडगंज३०,आसीनगर८ आणि मंगळवारी२४

Web Title: 200 patients of dengue in Nagpur city: crowd of patients in all hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.