११ लाखांच्या चोरीचे प्रकरण : हॉटेलचा कर्मचारीच निघाला चोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2019 10:44 PM2019-05-31T22:44:47+5:302019-05-31T22:45:33+5:30

व्यवसायानिमित्त नागपुरात आलेल्या आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या पुणे येथील एका उद्योजकाच्या बॅगेतून तब्बल ११ लाख रुपये चोरीला गेली. २६ दिवसानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून तहसील पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्यास अटक केली आहे. शिवाजी गणपत बुचडे (३८) रा. विरोली, पारनेर, जि. अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९ लाख १० हजार रुपये जप्त केले आहे.

11 lakh stolen case: The thief turned hotel employee | ११ लाखांच्या चोरीचे प्रकरण : हॉटेलचा कर्मचारीच निघाला चोर

११ लाखांच्या चोरीचे प्रकरण : हॉटेलचा कर्मचारीच निघाला चोर

googlenewsNext
ठळक मुद्देपुणे येथील उद्योजकाची रक्कम : तहसील पोलिसांचे यश

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : व्यवसायानिमित्त नागपुरात आलेल्या आणि हॉटेलमध्ये थांबलेल्या पुणे येथील एका उद्योजकाच्या बॅगेतून तब्बल ११ लाख रुपये चोरीला गेली. २६ दिवसानंतर या घटनेचा पर्दाफाश झाला. हॉटेलमधील कर्मचाऱ्यानेच ही चोरी केल्याचे उघडकीस आले असून तहसील पोलिसांनी आरोपी कर्मचाऱ्यास अटक केली आहे. शिवाजी गणपत बुचडे (३८) रा. विरोली, पारनेर, जि. अहमदनगर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याच्याकडून ९ लाख १० हजार रुपये जप्त केले आहे.
सहायक पोलीस आयुक्त वालचंद्र मुंढे यांनी शुक्रवारी पत्रपरिषदेत याबाबतची सविस्तर माहिती दिली. त्यांनी सांगितले की, पुणे येथील उद्योजक सतीश जेवरचंद सेठीया (५८) व्यवसायानिमित्त नागपुरात आले होते. ते तीन-चार महिन्यांपासून सेंट्रल एव्हेन्यू गांधीबाग येथील इंडिया सन हॉटेलमधील खोली क्रमांक ४०५ मध्ये थांबले होते. गेल्या ३ मे रोजी त्यांनी व्यवसायाचे रात्री ९ वाजता रोख ११ लाख रुपये आपल्या प्रवासी बॅगेत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते कामानिमित्त बोहर निघून गेले. रात्री परत आले. ५ तारखेला पहाटे त्यांनी आपली बॅग उघडून पाहिली तेव्हा बॅगमध्ये पैसे नव्हते. कुणीतरी अज्ञात चोरट्याने ती रक्कम लंपास केली होती. पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार मालवीय यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक रामदास पाटील, अमित बकतवार, किशोर महंत, अनिल चतुर्वेदी, रवींद्र पाटील यांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. हॉटेलमधील सीसीटीव्ही फूटेजची पाहणी केली. अखेर २७ दिवसानंतर आरोपीचा शोध लावण्यास पोलिसांना यश आले. या दरम्यान आरोपी शिर्डीला गेला होता. परंतु तो आपल्या घरी न जाता नागपूरला परत आला. नागपुरात वेगवेगळ्या लॉजमध्ये राहू लागला. शेवटी पोलिसांना त्याला मोठा ताजबाग परिसरात संशयास्पद अवस्थेत फिरतांना पकडले. त्याच्या जवळच्या बॅगची झडती घेतली असता त्यात ९ लाख १० हजार रुपये रोख सापडले. विचारपूस केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिली. या पैशातून त्याने एक बॅग व मोबाईल खरेदी केला होता. तसेच हॉटेल व लॉजमध्येही थांबला होता. यादरम्यान त्याने बराच पैसा खर्च केला.
दुचाकी व मोबाईल चोरांना अटक
तहसील पोलिसांनी दुचाकी व मोबाईल चोरोसही अटक केली. अर्पण राहुल पाटील रा. गोजी जि. वर्धा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याच्याकडून आतापर्यंत चार दुचाकी वाहनासह १ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. यासोबतच जरीपटका येथील शेख इमरान शेख सलीम आणि टीमकी येथील भूषण जगदीश पारडे या मोबाईल चोरासही अटक केली. त्यांच्याजवळून ४ मोबाईल फोनसह २५ हजार ४९० रुपयाचा माल जप्त करण्यात आला.

Web Title: 11 lakh stolen case: The thief turned hotel employee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.