ड्रॅगनफ्लायचे 100 वर्षांचे गूढ उलगडले! ‘माद्यां’वर प्रथमच संशाेधन; चार संशाेधकांचे जागतिक यश

By निशांत वानखेडे | Published: August 1, 2023 03:17 PM2023-08-01T15:17:13+5:302023-08-01T15:18:28+5:30

या संशाेधनाची नाेंद प्राणिशास्त्राच्या ‘झुटॅक्सा’ या जागतिक मासिकात झाली आहे.

100-year-old mystery of the dragonfly revealed First research on female dragonfly Global success of four inventors | ड्रॅगनफ्लायचे 100 वर्षांचे गूढ उलगडले! ‘माद्यां’वर प्रथमच संशाेधन; चार संशाेधकांचे जागतिक यश

ड्रॅगनफ्लायचे 100 वर्षांचे गूढ उलगडले! ‘माद्यां’वर प्रथमच संशाेधन; चार संशाेधकांचे जागतिक यश

googlenewsNext

नागपूर : गांजा म्हणजे शिंगरूच्या संशाेधनात जागतिक दर्जाचे यश नागपूरसह महाराष्ट्रातील चार संशाेधकांनी मिळविले. जगभरातील वैज्ञानिकांसाठी शंभर वर्षांपासून एक रहस्य असलेल्या ड्रॅगनफ्लाय प्रजातीच्या २ मादी गांजाच्या नमुन्यांची पहिल्यांदाच ओळख आणि वर्णन या संशाेधकांनी केले आहे. या संशाेधनाची नाेंद प्राणिशास्त्राच्या ‘झुटॅक्सा’ या जागतिक मासिकात झाली आहे.

कोणी केले संशोधन?
- नागपूर येथील रहिवासी व विद्याभारती विज्ञान महाविद्यालय, सेलूचे सहायक प्राध्यापक डाॅ. आशिष टिपले यांच्यासह एमआयटी वर्ल्ड पीस विद्यापीठ, पुण्याचे डाॅ. विश्वनाथ कराड व पंकज काेपर्डे तसेच डाॅ. अराजूष पायरा यांचा या संशाेधनात सहभाग आहे. 

- संशाेधित नमुन्यांमध्ये ‘सायक्लोगॅम्फस हेटरोस्टिलस’ आणि ‘इक्टिनोगॅम्फस डिस्टिंक्टस’ या दाेन ड्रॅगनफ्लायच्या मादी प्रजातींचा समावेश आहे.

हे संशोधन ड्रॅगनफ्लायच्या दोन प्रजातींच्या माद्यांच्या वास्तविक निष्कर्षांवर आहे. त्यांच्या ऐतिहासिक नोंदी गुंतागुंतीची प्रक्रिया हाेती. हे जगातील वैज्ञानिकांसाठी गूढ हाेते. आमचे संशाेधन जगभरातील वैज्ञानिकांच्या अभ्यासासाठी मैलाचा दगड ठरेल. शिवाय भारताच्या मौल्यवान जैवविविधतेच्या संवर्धनावरही याचा गहण प्रभाव पडेल.     
     - डॉ. आशिष टिपले, 
सहायक प्राध्यापक व संशाेधक
 

Web Title: 100-year-old mystery of the dragonfly revealed First research on female dragonfly Global success of four inventors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.