वाहने आणि सुरक्षा व्यवस्था ---अमेरिकन सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 11:33 PM2019-06-22T23:33:41+5:302019-06-22T23:37:06+5:30

अमेरिकेत वाहने, त्यांची सुरक्षा आणि कायदे कानून वेगळेच! भारताच्या तुलनेत अमेरिकेतील विविध वाहन कायदे कानून आणि येथील वाहतूक सुरक्षा तुलनात्मकरीत्या जाणून घेणे अत्यंत मनोरंजक ठरेल..

 Vehicles and Security System --- American Travel | वाहने आणि सुरक्षा व्यवस्था ---अमेरिकन सफर

वाहने आणि सुरक्षा व्यवस्था ---अमेरिकन सफर

Next
ठळक मुद्देअमेरिकेत गाड्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर नंबरप्लेट संबंधित स्टेटकडूनच दिल्या जातात.

- किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सी -

अमेरिकेत ‘आपली स्वत:ची’ वाहने नाहीत असा एकही माणूस कदाचित मिळणार नाही.! इथे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मोठ्या शहरांशिवाय इतर शहरांत गतिमान नसल्याने प्रत्येकाच्या घरी किमान एक वा दोन-चारचाकी वाहने असतातच..! एक नवऱ्याचे, तर दुसरे पत्नीचे.! पत्नीचे वाहन म्हणजे एखादी व्हॅन वा स्टेशन वॅगन असावे असे वाहन असते. त्यात एकतर माणसेही भरपूर बसतात व विकत घेतलेला मालही ठेवायला भरपूर जागा असते.

अमेरिकेत भिकारीही जे संख्येनेही नगण्य आहेत; त्यांचीही स्वत:ची वाहने आहेत, या केवळ एका वाक्याने अमेरिकेतील वाहनांच्या अफाट संख्येची कल्पना येईल. दुचाकी वाहने तशी कमीच पण असलीच तर त्या केवळ छोट्या सायकलीच..! या सायकलीही लहान मुले सुटीदिवशीच फिरविताना दिसतात. दुचाकी स्कूटर्स तर गेल्या तीनही वेळच्या आमच्या अमेरिका भेटीत आढळल्या नाहीत. अगदी अपवादानेच यामाहा, कावासकी, बीएमडब्ल्यू, रॉयल एन्फिल्ड, हर्ली डेव्हिडसन, अशा अवजड मोटारसायकलींचा ताफा... त्यावर युनिफॉर्म घातलेल्या गोºयापान स्वारांसह ‘डुग डूग डूग..' असा आवाज काढत येथे एकापाठोपाठ इकडून तिकडे जाताना दिसतोय... त्यामुळे अमेरिकन दुचाकीपेक्षा चारचाकींचाच प्रचंड शौकीन असून, दर चार-पाच वर्षांनी तो गाड्या बदलतो. त्यामुळेच येथील बहुतेक सर्व गाड्या नेहमीच ताज्यातवान्या, नव्या कोºया वाटतात. हे दिसण्याचे आणखी कारण म्हणजे येथील स्वच्छ, प्रदूषणविरहित व निर्मळ हवा..!

येथील सर्व गाड्या लेफ्टहँड ड्राईव्ह असल्याने ड्रायव्हरचे स्टेअरिंग व्हिल गाडीच्या डाव्या बाजूस असते. सर्व वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने हाकली जातात. रस्त्यावरील चारचाकी एखाद्या इंग्रजी बाँडपटात शोभतील इतक्या अलिशान, निमुळत्या आणि लांबसडक असतात की चक्क ‘देखते रह जाओगे...' या गाड्यांमध्ये होंडा, बीएमडब्लू, इंपाला, जीएमसी अशा अनेक कंपन्यांच्या गाड्या आहेत.

अमेरिकेत व्यापारी वाहनांपेक्षा निवासी लोकांची वाहने संख्येने आधिक दिसतात. व्यापारी वाहनांपैकी अवजड वाहने असलेले ट्रक्सही अत्यंत स्वच्छ.. येथे शाळेतील मुलांना शाळेत नेण्या-आणण्यासाठीही पिवळ्या रंगाच्या ट्रकच्या आकाराच्या लांबड्या स्कूल बसेस आहेत. अमेरिकेत सुमारे ९८ टक्के कार वा मोटारी तसेच अवजड ट्रकसारख्या वाहनांमध्ये चालक म्हणून महिलाच दिसतात.

येथील गाड्या दुरुस्त करणारे मेस्त्री असोत वा मेकॅनिक्स.. फोन करायचा अवकाश.. प्रत्यक्ष जागेवर येऊन वाहन घेऊन जातील आणि प्रामाणिकपणे कारवॉश दुरूस्ती आदी कामे करून वाहन जागेवर आणूनही देतील. 'पैश्याचं नंतर बघू...' हा दृढ विश्वास.. वाहनधारकही तितक्याच विश्वासाने इंटरनेट बँकिंगद्वारा बिल पे करतात. वाहनांच्या नोंदणीबाबत भारतात नसलेला महत्त्वाचा फरक इथे जाणवतो तो म्हणजे.. आपले वाहन येथील राज्या-राज्यांतून म्हणजेच न्यू जर्सी स्टेटमधून न्यूयॉर्क स्टेटमध्ये न्यायचे असेल तर अशा वाहनांच्या ‘ओनरशीप टायटलडीड (आरसी बुक)’वर आरटीओकडे अशी स्पष्ट नोंदणी करणे आवश्यक असते.. सर्वप्रकारच्या वाहनांची वार्षिक तपासणी वर्षातून एकदा आरटीओकडे आवश्यक असते.

अमेरिकेत गाड्यांना रजिस्ट्रेशन नंबर मिळाल्यानंतर नंबरप्लेट संबंधित स्टेटकडूनच दिल्या जातात. प्रत्येक वाहनधारकाला संपूर्ण विमा उतरविणे बंधनकारक असते. अमेरिकेत पेट्रोलसाठी आपल्यासारखीच पण भली मोठी फ्युएल स्टेशन असतात; पण एवढ्या मोठ्या पेट्रोलपंपावर एक वा दोनच पोरे असतात. पेट्रोलपंपांवर गर्दी झालीच तर पेट्रोल सोडणाºया अनेक लांबलचक पाईप असतात. त्यामुळे पेट्रोल पंपचा पोºया उभे असलेल्या ७-८ वाहनांमध्ये सहज पेट्रोल भरू शकतो. इथे लिटरऐवजी गॅलनमध्ये मोजले जाते.

Web Title:  Vehicles and Security System --- American Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.