मेहंदीने --- सजले रे क्षण माझे -- वेगळी वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2018 12:37 AM2018-12-09T00:37:44+5:302018-12-09T00:40:24+5:30

कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील मुलगी 'योग' शिकण्यासाठी बेंगलोरला जाते. तिथे जपानहून भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी आलेल्या मुलाच्या ती प्रेमात पडते .काही दिवसांनी त्यांचं लग्न होतं... संसारवेल फुलते आणि अचानक नवरा आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो....

 Mehndi --- Sajle ray moment my - a different way | मेहंदीने --- सजले रे क्षण माझे -- वेगळी वाट

मेहंदीने --- सजले रे क्षण माझे -- वेगळी वाट

Next
ठळक मुद्देनिम्म्याहून जग मी पालथी घातलंय पण भारताची सर कोणालाच येणार नाहीदोघांच्या घरच्यांकडून या लग्नाला कडाडून विरोध झाला. चार वर्षात त्यांची संसारवेल बहरली.

- महानंद मोहिते

कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याश्या गावातील मुलगी 'योग' शिकण्यासाठी बेंगलोरला जाते. तिथे जपानहून भारतीय संस्कृती अभ्यासण्यासाठी आलेल्या मुलाच्या ती प्रेमात पडते .काही दिवसांनी त्यांचं लग्न होतं... संसारवेल फुलते आणि अचानक नवरा आध्यात्मिक क्षेत्राकडे वळतो.... संसाराची जबाबदारी एकटीवर येवून पडते... दोन मुलींना उराशी धरून ती जपान सारख्या अनोळखी देशात तग धरून नेटानं उभी राहते. जापनीज माध्यमांना भारतीय वनौषधींची दखल घेण्यास भाग पाडते त्या जिगरबाज कोल्हापुरी मुलीची ही यशोगाथा आहे . तिचं नाव आहे.' सीमा नागासावा' एखाद्या चित्रपटाची कथा वाटावी असा त्यांचा जीवन प्रवास आहे .

सीमा ताईंचं नाव जपानमध्ये आदरानं घेतलं जातं. यापाठीमागे त्यांनी घेतलेली कठोर मेहनत आणि गेली तीस वर्ष आर्युवेदावर त्यांनी केलेला सातत्यपूर्ण अभ्यास आहे . सीमा पाटील ते नागासावा हा पल्ला खूप मोठा. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील चंद्रे हे सीमाताईंचं गाव . त्या सात- आठ महिन्याच्या असताना त्यांच्या आईचे निधन झाले. वडिलांनी त्यांचा व त्यांच्या बहिणीचा सांभाळ केला. सीमाताईंनी कोल्हापूरच्या छत्रपती शाहू विद्यालयात काही काळ अध्यापनाचं काम केलं . नंतर त्या गोव्यातील एका शाळेमध्ये शिकवू लागल्या. दरम्यान योगा शिकण्यासाठी त्यांनी बेंगलोरमधील विवेकानंद केंद्रात प्रवेश घेतला.

भारतीय संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी विशेषत: संत साहित्याचा अभ्यास करण्यासाठी जपानहून हिरोशी नागासावा हा तरुण तिथे आला होता .हिरोशीचे वडील उद्योजक होते. सीमाताई आणि हिरोशी यांची ओळख झाली. योग , संत साहित्यावर चर्चा करायचे यामुळे मैत्री वाढली, पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दरम्यानच्या काळात सीमाताईंचे वडील गेले. ज्या संस्थेसाठी त्या प्रूफरिडींगचे काम करायच्या त्यांच्याकडून त्यांना जपानमध्ये कामानिमित्त पाठवण्यात आले.

जपानमध्ये गेल्यानंतर हिराशी व सीमातार्इंनीलग्न करण्याचा निर्णय घेतला जपानमध्ये त्यांनी नोंदणी विवाह केला. दोघांच्या घरच्यांकडून या लग्नाला कडाडून विरोध झाला. चार वर्षात त्यांची संसारवेल बहरली. माया आणि साया या त्यांच्या दोन गोंडस मुली. नियतीच्या मनात मात्र वेगळे होते. हिरोशींना संसार सोडून संन्यासी व्हायचे होते. त्यांनी हा विचार आपल्या पत्नीला बोलून दाखवला.सीमा ताईच्या पायाखालची जमीन सरकली. माहेरी त्यांना साथ देणारे कोणीही नव्हते. त्यामुळे त्यांनी मुलींना घेऊन जपानमध्येच राहण्याचा निर्णय घेतला. त्याची आध्यात्मिक ओढ लक्षात घेऊन मी हिरोशीच्या निर्णयास सहमती दर्शवल्याचे सीमाताई सांगतात .

उदरनिवार्हासाठी एका मैत्रिणीच्या सल्याने सीमाताईंनी इंग्रजीचे क्लासेस सुरू केले.सीमाताईंचं शिक्षण भारतीय असल्यामुळे त्यांना नोकरी मिळण्यास अडचणी येत होत्या.त्यांचा एक विद्यार्थी केसगळतीच्या समस्येने खूप वैतागला होता.त्याला त्यांनी मेहंदी लावली आणि त्याला फरक जाणवू लागला .केस गळती बऱ्यापैकी आटोक्यात आली. दरम्यान सीमातार्इंनाक्लास बंद करावा लागला. त्यामुळे पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागणार होती. ज्या विद्याथार्ला त्यांनी मेहंदी लावली होती त्याचा रिझल्ट उत्तम होता. त्याने आपल्या केस गळतीने त्रस्त असणाºया तीन चार मित्रांना ही गोष्ट सांगितली. सीमाताईंनी ठरवलं आता आपण मेहंदीवरच जपान मध्ये तग धरू शकतो.

जापनीज लोक आपल्या स्कीनबाबत खूप संवेदनशील असतात. त्यामुळे मेहंदी खात्रीशीर आहे का? काय वाईट परिणाम होणार नाही ना ? या प्रश्नांचा सीमाताईंवर भडिमार असायचा. त्यावेळी मेहंदीला जपानने सौंदर्य प्रसाधन म्हणून मान्यता दिली नव्हती. आॅर्डर्स मिळू लागल्या. पण सीमाताईं भारतीय असल्यामुळे त्यांना जागा भाड्याने मिळणं नामुष्कीचं झालं होत. सीमा ताईंच्या मेहंदीचा प्रसार खूप दूरवर होवू लागला. जापनीज लोक केसांना मेहंदी लावण्यासाठी फार विश्वास ठेवत नव्हते. अशा वेळी . तुमच्या केसांना मेहंदीमुळे अपाय झाला तर त्याला मी जबाबदार असेन असे पत्र त्या लिहून देत असत .

मेहंदी वरचा जापनीज लोकांचा विश्वास वाढवण्यासाठी त्यांनी एका जपान विद्यापीठात संशोधन करायचं ठरवलं.विद्यापीठाने त्यांना परवानगी दिली.सहा वर्ष सातत्यपूर्ण अभ्यास केल्यानंतर जापनीज लोकांना वैज्ञानिक आधारावर उत्तरे देणं शक्य झालं.सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या या संशोधनाची दखल घेवून जपान सरकारने मेहंदीला सौंदर्य प्रसाधन म्हणून परवानगी दिली.

सीमाताईंचा जम आता चांगला बसला होता. २००० साली त्यांनी जपानमध्ये ‘मुक्ती’ नावाची संस्था सुरू केली.यासंस्थेमार्फत त्यांनी मेहंदीचे कोर्सेस सुरू केले. मेहंदीवर आधारित पुस्तके लिहिली. जापनीज माध्यमांनी यावर स्टोरीज केल्या .चर्चासत्र, टी. व्ही. शोज मध्ये त्या झळकू लागल्या.सीमाताईंनी वनौषधींचा अभ्यास करायचं ठरवलं. त्या कोल्हापुरात आल्या . वनऔषधींचे अभ्यासक डॉ .सुनील पाटील यांच्याकडे त्यांनी माहिती घेतली. मुक्ती संस्थे मार्फत आजमितीला १५ आयुर्वेदिक प्रॉडक्ट्स तयार केली जातात.

आपल्या पुर्वजांच्या माहितीवर .मेहंदीने माझं अस्तित्व घडवलं .आयुष्य रंगवलं .मला स्वावलंबी बनवलं , लेकींना चांगलं शिक्षण देवू शकले .जपानमध्ये स्वत:चं घर घेतलं .शेकडो लोकांना रोजगार मिळाले याचं मला समाधान वाटतं .निम्म्याहून जग मी पालथी घातलंय पण भारताची सर कोणालाच येणार नाही . असे त्या म्हणतात. सीमा ताईंचा प्रवास अतिशय खडतर होता .पण त्या डगमगल्या नाहीत .आपल्या स्वभावातून त्यांनी सर्वांची मनं जिंकली .

 

 

Web Title:  Mehndi --- Sajle ray moment my - a different way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.