शौकीन पण...! अमेरिकन सफर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 01:04 AM2019-07-14T01:04:32+5:302019-07-14T01:06:30+5:30

अमेरिकन मद्याचे शौकीन असले तरी त्यांनी त्याला मर्यादेचे कुंपण घालून घेतले आहे. आली तलफम्हणून लावला ग्लास तोंडाला, असे काही इथे होत नाही.

But fond ...! American Travel | शौकीन पण...! अमेरिकन सफर

शौकीन पण...! अमेरिकन सफर

Next

किरण कर्नाड, डेटन, न्यू जर्सी

अमेरिकन मद्याचे शौकीन असले तरी त्यांनी त्याला मर्यादेचे कुंपण घालून घेतले आहे. आली तलफम्हणून लावला ग्लास तोंडाला, असे काही इथे होत नाही. कामावेळी काम आणि सुटीला एन्जॉय अशी इथली पद्धत सर्वच गोष्टींना जणू न्याय देणारी ठरते, हे इथल्या संस्कृतीवरून पाहायला मिळते.

मूळ अमेरिकन नागरिक मद्याचा खूप आशिक आहे. वयात आलेले जवळजवळ नव्याण्णव टक्के अमेरिकन स्त्री-पुरुष मद्य घेतात! पण त्याचा अतिरेक मात्र नसतो. केवळ विरंगुळा म्हणून ते घेतले जाते! तेथील वाईन इंडस्ट्री जगातील मोठ्या गणल्या जाणाऱ्या वायनरी उद्योगांपैकी एक असावी.. असे असले तरी अमेरिकन माणसाचा स्वभावधर्मच असा आहे की तो आॅफिस कामाशी, व्यवसायाशी पूर्णपणे प्रामाणिक व एकनिष्ठ असतो. यामुळे सोमवार ते शुक्रवार कामाच्या दिवशी या शौकापासून तो दूरच असतो. सुटीदिवशी मात्र तो कुटुंबीयांसमवेत मद्याचा आस्वाद घेतो. तसं म्हटलं तर भारत हाही मद्यनिर्मितीत जगात अग्रभागी असलेल्या काही देशांपैकी एक आहे.

मद्यापासून भारतातील राज्यांना चांगले उत्पन्न मिळते; पण भारतात मद्य घेणे काहीसे अप्रतिष्ठेचे मानले जाते, त्यामुळे येथील बहुतांश दारूची दुकाने छोटी छोटी व कुठेतरी कोपºयात आडवाटेला असतात. अमेरिकेत मात्र स्टेशनरी, किराणा माल, होजिअरी, कपडे, टायर-ट्यूब, खेळणी यांचे जसे स्वतंत्र मॉल दिमाखात उभे आहेत, तसेच लिकरसाठीही भव्य मॉल आहेत. ‘ज्यो कॅनॉल’ नावाने अमेरिकेत प्रसिद्ध असलेल्या महाप्रचंड मॉलमध्ये जाण्याची संधी मिळाली. हा मॉल केवळ आणि केवळ लिकर्सचाच आहे. या मॉलमध्ये जगातील बहुधा सर्वच ‘लिकर प्रोड्युसिंग’ देशातील मद्य मुबलक उपलब्ध आहे.

ब्रँडी, जीन, स्कॉच, व्हिस्की, आदी मॉलच्या भिंतीच शंभर ते दीडशे फूट उंच असाव्यात व तो आठ ते दहा हजार स्क्वे. फूट जागेत उभा असावा. या मॉलमधला एकतृतीयांश भाग केवळ वाईनसाठी राखीव आहे, तर यातील एक भाग बीअरचा व एकेक भाग केवळ व्हिस्की, रम, ब्रँडी, अशा विविध मद्यांच्या प्रकारासाठी आहे. प्रत्येक विभागांत कोणते मद्य आहे? ते किती वर्षांचे आहे, कोणत्या देशाचे आहे इथंपासून त्याच्या अधिकृत किमतीची पाटीही दर्शनी लावलेली असते. या मद्यात बीअर हे मद्य सर्वांत स्वस्त असावे! स्वस्त म्हणजे इतके की पिण्याच्या पाण्याच्या बाटलीच्या किमतीपेक्षा थोडेसेच महाग. यामुळे घरात एखादी पार्टी असेल तर एक तर थेट मोठे क्रेटस् आणले जातात वा बीअरची भलीमोठी टाकीच (लार्ज डिस्पेन्सर्स) आणली जाते. याला तोटीही असते.

यातून प्रत्येकाला हवी तेवढी बीअर घेता येते. येथे मद्याची किंमत ते मद्य किती जुने आहे यावर ठरते..! उदा. एखाद्या कंपनीचे मद्य १० वर्षे जुने असल्यास एखाद्या एक लिटर बाटलीची किंमत १२ डॉलर असेल तर याच कंपनीच्या मद्याची ते २० वर्षे जुने असल्यास केलेली किंमत ४५ डॉलरइतकी असते. इथे बहुतांश अमेरिकेन लोक वाईनच घेतात. म्हणजे असे की वाईन न घेणारा माणूस हा येथील मद्यपींच्या समूहातला कच्चा लिंबू मानला जातो. येथे व्हिस्की विशेष प्रचलित नाही. वाईनखालोखाल रम (कॅप्टन मॉर्गन), व्हाईट रम (बकार्डी) आणि वोडका यांचे सेवन अधिक असते. वाइन थंड राहावी म्हणून मोठ्या जारमध्ये मध्यभागी बाटली ठेवून सभोवताली बर्फ घातले जाते.

येथे व्हिस्कीला ती उंची दर्जाची असल्यास स्कॉच म्हटले जाते. येथे काही स्कॉच व्हिस्की लोकप्रिय आहे. ‘दा ग्लेनफिडीच, जॅक डॅनिअल, केंटूकी, आदी.अमेरिकेत एखाद्या समारंभाला जावयाचे असल्यास भेट म्हणून थेट वाईनची बाटली देण्याची पद्धत आहे. अमेरिकेत वाईन टेस्टिंगचा अनोखा प्रकार पाहायला मिळाला. वाईन पिण्याच्या निमूळत्या ग्लासमध्ये ड्राय रोझ, टग बोट, ड्राय रेड अशा व्हरायटी रोचक वाईन या ग्लासच्या पाव टक्के भरल्या जातात. पॅम्प्लेटमधील कोणतीही सहा वाईन सँपल्स चव पाहण्याकरिता दिली जातात. काही ठिकाणी टेस्टिंगसाठी दोन ते तीन डॉलर आकारले जातात; पण यारो.. यांच्या सेवनाची लज्जत काही औरच..!


 

Web Title: But fond ...! American Travel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.