भाकरी गिळणारे मशीन

By admin | Published: April 29, 2016 10:42 PM2016-04-29T22:42:28+5:302016-04-29T22:42:28+5:30

काय होते आहे हे कळायच्या आत आपण जे काम करून रोजीरोटी कमावतो, त्याचे कारणच मुळात संपून गेले आहे, असा अनुभव घेतलेली आणि काय घडते

Breading machine | भाकरी गिळणारे मशीन

भाकरी गिळणारे मशीन

Next
>- विशेष प्रतिनिधी
 
काय होते आहे हे कळायच्या आत आपण 
जे काम करून रोजीरोटी कमावतो, 
त्याचे कारणच मुळात संपून गेले आहे, 
असा अनुभव घेतलेली आणि काय घडते आहे याचा नीटसा अंदाज येण्याच्या आत थेट बेरोजगारच झालेली माणसे आपल्या आजूबाजूला दिसू लागली आहेत.
हाच आहे सध्याच्या जगापुढचा एक मोठा, गुंतागुंतीचा प्रश्न. 
रोजगाराचे, माणसे करतात त्या कामाचे भवितव्य! - फ्युचर ऑफ जॉब्ज!
जुने रोजगार संपतील, कालबाह्य होतील, 
नवे निर्माण होतील. पण त्यासाठीची कौशल्ये हस्तगत करणा:या मनुष्यबळासाठी 
प्राधान्याने त्या संधी उपलब्ध असतील.
- मग अशा जगात हाडामासाच्या जिवंत माणसाने काय करावे? स्वत:च निर्माण केलेल्या तंत्रचा गुलाम म्हणून राहावे?
तज्ज्ञांच्या मते याचे उत्तर मात्र ‘नाही’ असे आहे.
 
विसाव्या दशकाच्या प्रारंभी अमेरिकेतल्या कामगार वर्गापैकी तब्बल एक्केचाळीस टक्के लोक शेतीच्या उद्योगात होते. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे 197क् सालार्पयत हे प्रमाण फक्त चार टक्क्यांवर आले.
आणि आजघडीला अमेरिकेतल्या एकूण मनुष्यबळाच्या जेमतेम दोन टक्के लोक शेतीमध्ये काम करून आपला रोजगार कमावतात.
..वरवर पाहता ही आकडेवारी तशी सवयीची वाटते. कारण हे बदल एका विशिष्ट गतीने शंभर-सव्वाशे वर्षात घडत आले. अमेरिकेत ज्याचे-त्याचे अभ्यास करतात म्हणून ही आकडेवारी! जगाच्या इतर भागातही कमी अधिक फरकाने असे बदल घडतच गेले.
तंत्रज्ञानाने लोकांच्या जुन्या नोक:या खाल्ल्या आणि नव्या निर्माणही केल्या. या प्रवासात संघर्ष घडले. माणूस विरुद्ध मशीन असा सामना लढला गेला. भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या देशांमध्ये माणसाचे काम हिरावून घेणा:या यंत्रंच्या विरोधात लोक रस्त्यावर उतरले. भारतात नाही का एकेकाळी कॉम्प्युटरला राक्षस ठरवून टोकाचा विरोध झाला होता! जगाची गती आणि दिशा बदलणा:या औद्योगिक क्रांतीच्या प्रत्येकच टप्प्यावर असे अस्तित्वाचे प्रश्न निर्माण झाले, संकटांच्या पोटातूनच नव्या संधी आल्या.
पण हे बदल जिरवण्याची समाजाची क्षमता होती, कारण त्या बदलांचा वेग. मोठय़ा बदलाची चाहूल लागून तो प्रत्यक्ष आकाराला येईर्पयत किमान दोन ते तीन पिढय़ांचा काळ सरकत राहिला होता.
..आता मात्र चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर उभ्या असलेल्या जगाकडे एवढा वेळ नाही.
वेळच नाही. ना समजून घ्यायला, ना सावरायला, ना बदलात तगून राहणो-जगणो शिकून घ्यायला.
काय होते आहे हे कळायच्या आत आपण जे काम करून रोजीरोटी कमावतो, त्याचे कारणच मुळात संपून गेले आहे, असा अनुभव घेतलेली आणि काय घडते आहे याचा नीटसा अंदाज येण्याच्या आत थेट बेरोजगारच झालेली माणसे आपल्या आजूबाजूला दिसू लागली आहेत.
हाच आहे सध्याच्या जगापुढचा एक मोठा, गुंतागुंतीचा प्रश्न.
रोजगाराचे, माणसे करतात त्या कामाचे भवितव्य!
- फ्युचर ऑफ जॉब्ज!
याच शीर्षकाचा एक विस्तृत अहवाल वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच प्रसिद्ध केला असून, वेगाने बदलत्या तंत्रज्ञानामुळे आणि वेगवेगळ्या तंत्रज्ञानांच्या एकत्रित संयोगामुळे (टेक्नॉलॉजी कन्व्हजर्न्स) सध्या अस्तित्वात असलेले रोजगार किती वेगाने नष्ट होतील याबद्दलचा अंदाज त्यात मांडला आहे.
येत्या पाच वर्षात जगभरातल्या अर्थव्यवस्थांमधून सुमारे 7क्,क्क्क्,क्क् नोक:या थेट नष्टच होतील, असे हा अहवाल म्हणतो. याला कारण आहे सुपर स्मार्ट रोबॉटिक्स, थ्रीडी प्रिंटिंगसारख्या वेगाने प्रगत होत चाललेल्या टेक्नॉलॉजीज, मोबाइल इंटरनेटने दिलेल्या कनेक्टिव्हिटीमुळे बदलणारे व्यवहारांचे चक्र आणि बदलत्या उत्पादन-सेवा पद्धती!
हे नवे तंत्रज्ञान जुने रोजगार खाईल, पण मग नवे निर्माण करणार नाही का?
- या स्वाभाविक प्रश्नाचे उत्तर तेवढे सोपे आणि सरसकट आशादायी नाही, असे हा अहवाल सांगतो.
नव्याने तयार होणा:या संधी कुशल मनुष्यबळासाठी असतील आणि ही कुशलतेची व्याख्या सातत्याने बदलती राहील. 
अगदी सोपे उदाहरण घ्यायचे तर नव्याने येणारे स्वयंचलित यंत्र बांधकामावरच्या शंभर मजुरांचे आठ दिवसांचे काम काही तासात एकटय़ाने करील आणि अशा यंत्रंशी जुळवून घेण्यासाठी नेमलेले इंजिनिअर्स यंत्रतल्या सुधारणांचा वेग गाठू शकले नाहीत तर अनावश्यक ठरून घरी पाठवले जातील.
- आणि हे सगळे आजोबा-वडील-नातू अशा तीन पिढय़ांच्या आयुष्यात टप्प्याटप्प्याने नव्हे, तर अवघ्या काही वर्षाच्या अंतराने एकाच माणसाच्या कार्यकाळात घडेल.
आपण शाळा-कॉलेजात जे शिकलो आहोत, त्या पुंजीवर अख्खे आयुष्य सोडाच, दोन-तीन वर्षाची एक नोकरीसुद्धा धड करता येणार नाही, अशी शक्यता निर्माण होईल.
- हीच ती चौथी औद्योगिक क्रांती.
इंग्रजी संज्ञा वापरायची तर इंडस्ट्री:4
यंत्रमानवानेच जग चालवायला घेतले तर? स्वयंपाकापासून कारखान्यात गाडय़ा बनवण्यार्पयत सारी कामे तोच करू लागला तर?.. अशा विषयांवर विद्यार्थीदशेत कल्पनारंजन करणारे निबंध लिहितालिहिता नव्या पिढीच्या नशिबी ते चित्र वास्तव म्हणून येऊ घातले आहे.
व्हच्यरुअल रिअॅलिटीमुळे माणसामाणसातले प्रत्यक्ष संवाद-संबंध संपतीलच का? - असे नवे प्रश्न, नव्या शक्यता विचारासाठी खुल्या झाल्या आहेत, ते वेगळेच!
- या बदलत्या चित्रचा थेट परिणाम रोजगाराच्या बाजारपेठेवर होणार असल्याचे निष्कर्ष सातत्याने मांडले जात आहेत. वल्र्ड इकॉनॉमिक फोरमने दिलेला त्याबाबतचा अंदाज हा त्यातला ताजा! तिस:या औद्योगिक क्रांतीच्या अखेरच्या टप्प्यात तंत्रज्ञानाचा सैराट वेग आपल्या जगण्यात आला-रुजला; आता तोच वेग आपल्या हातचे काम हिरावून घेण्याच्या/बदलण्याच्या तयारीत आहे. पहिल्या औद्योगिक क्रांतीत वाफेतील ऊज्रेचा वापर वस्तू उत्पादनासाठी केला गेला. दुस:या क्रांतीत विद्युत ऊज्रेचा वापर मोठय़ा प्रमाणात उत्पादन घेण्यासाठी झाला आणि त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाच्या पंखांवरून आलेल्या तिस:या औद्योगिक क्रांतीने इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि स्वयंचलित उत्पादन पद्धतीने (अॅटोमॅटिक मशीनद्वारे उत्पादन) उद्योग क्षेत्रचे रूपच बदलले. आता त्याच्या पुढचा प्रवास कुशल मनुष्यबळासाठी अतीव आव्हानात्मक ठरणारा असला, तरी कष्टकरी, अर्धकुशल आणि अकुशल मनुष्यबळाचे काय? - हा प्रश्न गंभीर वळण घेऊन जगभरातल्या सर्वच अर्थव्यवस्थांसमोर उभा आहे. या दोन टोकांमधल्या मध्यमवर्गाचे - जो या नव्या व्यवस्थेत सर्वात मोठा उपभोक्ता असणार आहे - काय, हाही प्रश्न आहेच. औद्योगिक प्रगतीच्या हरेक टप्प्यावर पहिली कु:हाड श्रमकरी वर्गावर कोसळली, हे तर खरेच; पण त्यातून तगून राहण्यासाठी थोडा वेळ तरी मिळाला. नव्या वेगवान जगाकडे तर तेवढी उसंतही असणार नाही, असे तज्ज्ञ म्हणतात.
तार पोहोचवणारा, पत्र पोहोचवणारा, टेलिफोन बूथवरून फोन लावून देणारा ही अशी माणसे काळ बदलला, तशी कुरिअर कंपन्यांमध्ये सामावली गेली, मोबाइल दुरुस्ती करू लागली. थोडक्यात, गेलेल्या कामाशी संबंधित नव्याने आलेल्या उत्पादन-सेवा क्षेत्रंमधली नवी कौशल्ये शिकून घेत त्यांनी आपले रस्ते बदलले. - तसा, तेवढा वेळ मिळणो आता अवघड होत जाणार. खेळण्यातल्या गाडीपासून ते ख:याखु:या कार्पयत आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक वस्तूच्या निर्मितीच्या प्रक्रिया वेगाने ‘अॅटोमेशन’वर येऊ लागल्या आहेत. अगदी छोटय़ातला छोटा ‘स्क्रू’ जरी घट्ट करायचा असला तरी एक ‘स्क्रू ड्रायव्हर’ घेऊन मशीनचा ‘हात’ समोर आलेला असतो. 
आधी संगणकातल्या सॉफ्टवेअरने अनेक कामे उचलली. आता शेतीपासून ते इमारतबांधणीर्पयत अन् रुग्णांच्या निदानापासून ते ऑपरेशनर्पयत सा:यांच्या क्षेत्रत ‘रोबोटिक’ उपकरणांचा वापर वाढला आहे. जपानी कारखान्यांमध्ये प्रत्येक दहा हजार कामगारांमागे दीड हजार रोबो काम करतात. हे प्रमाण वाढते राहणार.
हे रोबो आता गाडय़ा बनवण्याबरोबर ऑपरेशन्स करणार, मुलांना शिकवणार आणि हॉटेले-विमानतळ अशा सेवा क्षेत्रतही शिरणार!
काम-विचार-कल्पना अशा सगळ्याच गोष्टींचे आयाम बदण्याची शक्ती या क्रांतीत असेल आणि या नव्या टेक्नोजगतात रोजगार-बेरोजगारीचे सारेच प्रश्न जुनी समीकरणो पुसून टाकत नवे रूप घेतील.
जुने रोजगार संपतील, कालबाह्य होतील, नवे निर्माण होतील. पण त्यासाठीची कौशल्ये हस्तगत करणा:या मनुष्यबळासाठी प्राधान्याने त्या संधी उपलब्ध असतील.
- मग अशा जगात हाडामासाच्या जिवंत माणसाने काय करावे?
स्वत:च निर्माण केलेल्या तंत्रचा गुलाम म्हणून राहावे?
तज्ज्ञांच्या मते याचे उत्तर मात्र ‘नाही’ असे आहे.
दावोसमध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या व्यासपीठावर रंगलेल्या एका चर्चेचे दोन निष्कर्ष होते :
1. माणसाने तंत्रज्ञानासोबत / यंत्रसोबत काम करण्याची अशी कौशल्ये शिकून घ्यावीत की कोणतेही यंत्र माणसाला ‘रिप्लेस’ करू शकणार नाही.
2. यंत्रकडे नसलेल्या ‘मानवी’ गुण-वैशिष्टय़ांचे जतन आणि विकास हे यंत्रवर मात करण्याचे सर्वात शक्तिशाली आणि एकमेव हत्त्यार आपल्याकडे आहे, याचा विसर माणसाने पडू देऊ नये.
 
 
तगून राहायचे असेल तर..
कौशल्य विकास हे एकच उत्तर आरेतज्ज्ञ देत आहेत. सध्या भारतात प्रचंड चर्चेत असलेली ही संकल्पना जगभरातल्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांसाठीही अत्यंत कळीची ठरणार आहे. केंद्रात नवे सरकार आल्यापासून भारतातील सध्याच्या कामगारांच्या आणि होऊ घातलेल्या भविष्यातील ‘वर्क फोर्स’च्या कौशल्य विकासावर भर देण्याची मोहीम सुरू झालेली आहे.. जगातील सर्वात तरुण ‘वर्क फोर्स’ असलेला आपला देश कुशल कामगारांचीही खाण होऊ पाहतोय. पण.. सध्या शिकवली जाणारी ‘कौशल्ये’ प्रत्यक्ष तरुणांर्पयत पोचायच्या आधीच ‘अपग्रेड’ करावी लागण्याची वेळ येते आहे. या शर्यतीत जो कुणी उतरेल आणि सर्व शक्तीनिशी धावेल त्याच देशाच्या पदरात नवे रोजगार पडतील, असे एकूण चित्र आहे.
 
भविष्यात काय वाढून ठेवले आहे?
वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे व्यासपीठ वर्तमान आणि भविष्यातील बदलांवर बारीक लक्ष ठेवून असते. गेल्या जानेवारीत स्वित्ङरलड येथील दावोसमध्ये झालेल्या वार्षिक बैठकीचे सूत्र होते : चौथी औद्योगिक क्रांती, त्यातून येणा:या संधी आणि आव्हाने. जगभरातून आलेल्या मान्यवरांपुढे चर्चेसाठी ठेवलेली सूत्रे होती-
-  चौथी औद्योगिक क्रांती ‘डिजिटल-ह्यूमन-फिजिकल’ या सा:याचा संयोग (एककेंद्राभिमुखता) घडवेल. जेव्हा सॉफ्टवेअरच सा:याच्या मुळाशी येऊन मुख्य कारक म्हणून गोष्टी बदलू लागेल तेव्हा काय घडेल?
- नव्या रचनेत जुनी ‘पॉवर स्ट्रक्चर्स’ उद्ध्वस्त होतील. नव्या सत्ताकेंद्रांची रचना कशी असेल? कोण अधिक बलवान होईल, कोणाच्या हातून सूत्रे निसटतील?
- नव्या संदर्भात ‘माणूस विरुद्ध यंत्र’ हा जुना संघर्ष नवे रूप घेईल. शिक्षण-कौशल्ये-रोजगार यांचे संदर्भ आणि नाते बदलेल. या नव्या व्यवस्थेत ‘रोजगाराचे भविष्य’ नेमके काय असेल?
- येत्या काळात माणूस तंत्रज्ञान बदलेल आणि तंत्रज्ञान माणसाला बदलत राहील. या चक्रातून/चक्रामुळे तंत्रज्ञान आणि मानवता यांच्यामध्ये कोणते नाते आकाराला येईल?
 
मधले ते सारे संपेल?
कोणतेही उत्पादन घेणारी किंवा सेवा देणारी कंपनी आणि तिचे ग्राहक यांच्यातले अंतर झपाटय़ाने कमी होणो हा चौथ्या औद्योगिक क्रांतीचा सर्वाना थेट जाणवणारा दृश्य परिणाम. येणा:या काळात आपल्याच उत्पादन/सेवेला अधिक मागणी असावी यासाठी कंपनीचा आणि ग्राहकांचा थेट संवाद अपरिहार्य ठरेल. ग्राहकांच्या प्रतिसाद/अपेक्षांनुसार उत्पादन/ सेवेत तत्काळ बदल ही त्याच्या पुढली पायरी. या थेट संपर्क-संवादासाठी आधुनिक साधने उपलब्ध झाल्याने मधल्या स्तरावरले सर्व मध्यस्थ पुसले जातील. (येथेच मोठय़ा प्रमाणावर रोजगार गिळले जातील.) या संक्रमणासाठी कंपन्यांना आपल्या बिझनेस मॉडेल्समध्येच बदल करावा लागेल. शिओमी या मोबाइल उत्पादक कंपनीने गेल्या वर्षी जवळपास 1क् कोटी मोबाइल विकले आणि चीनमध्ये सॅमसंगसारख्या कंपनीवर मात केली. कारण काय? तर मध्यस्थ साखळ्यांना रजा देऊन आवाक्यात राखलेली किंमत!
 
चौथी औद्योगिक क्रांती : नेमके काय होईल?
- वेगवान उत्पादन. खर्च कमी. बाजारातील मागणी वाढेल.
- जगभरातील लोकांच्या उत्पन्नात आर्थिक वृद्धीचे नवे उच्चांक गाठले जातील.
- कुशल आणि सक्षम लोकांसाठी अनेक चांगल्या नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. 
- रोबोट्सचं युग असेल आणि त्यामुळे कामगार संघटनांच्या कटकटींपासून कंपन्यांची सुटका होईल.
- जीवनमान सुधारेल, जगणं आणखी सोपं होईल. 
- दळणवळण-संपर्क-संवाद माध्ममांमध्ये झपाटय़ाने बदल होतील. 
- श्रमशक्ती कमी होऊन कौशल्यावर आधारिक काम अधिक होईल.
- भांडवलापेक्षाही ‘टॅलेंट’ सरस ठरेल.
 
स्त्रियांच्या संधी घटणार?
या आधीच्या औद्योगिक क्रांतीच्या प्रत्येक टप्प्यावर जगभरातल्या स्त्रियांना नवनवी संधी मिळत गेली. रोजगारासाठी बाहेर पडणो क्रमप्राप्त झाल्याने कुटुंबातली, समाजातली आर्थिक पत वाढण्यापासून तंत्रज्ञानाच्या वापराने घरकामात आलेल्या सुकरतेर्पयत अनेक दाने स्त्रियांच्या मनासारखी पडत आली. - पण उंबरठय़ावर असलेली चौथी औद्योगिक क्रांती मात्र स्त्रियांच्या हाती आज असलेल्या शक्यता हिरावून घेईल, असे भाकीत वल्र्ड इकॉनॉमिक फोरमने केलेल्या अभ्यासात वर्तविण्यात आलेले आहे.
याचे कारण : वेगाने प्रगत होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या क्षेत्रत असलेला स्त्रियांचा अल्प वावर. रोबोटिक्स आणि थ्री-डी प्रिंटिंगसारख्या अतिप्रगत तंत्रज्ञानाच्या वापरामुळे येत्या पाच वर्षात जगाच्या प्रगत बाजारपेठांमधून तब्बल सत्तर लाख रोजगार गिळले जातील, असे हा अभ्यास सांगतो.
आकडेवारी पाहिली तर ही कु:हाड स्त्रिया (48 टक्के) आणि पुरुष (52 टक्के) यांच्यावर साधारण सम प्रमाणात कोसळेल असे दिसते. पण आत्ताच्या जॉब-मार्केटमध्ये पुरुषांचे एकूण प्रमाण स्त्रियांपेक्षा कितीतरी जास्त असल्याने प्रत्यक्षात स्त्रियांच्या वाटय़ाला अधिक संकटे वाढून ठेवलेली असतील.
जगभरात स्त्रियांच्या हातून जाणा:र्या प्रत्येक पाच रोजगार संधींमागे फक्त एक नवी संधी त्यांच्या वाटय़ाला येईल. हेच प्रमाण पुरुषांच्या बाबतीत तिनास एक असे असेल.
हे असे का?
त्याचे महत्त्वाचे कारण आहे आधुनिक जगातील बाजारपेठेला आकार देणा:या रळएट या क्षेत्रत असलेला स्त्रियांचा अल्प वावर.
सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथेमॅटिक्स या चार कळीच्या क्षेत्रंमधले प्रगत संशोधन सर्वाधिक नवे रोजगार तयार करील. या क्षेत्रतला स्त्रियांचा सहभाग कमी असल्याने या नव्या रोजगार संधी त्यांच्या वाटय़ाला येणार नाहीत.
 त्यामुळे रोजगाराच्या क्षेत्रत स्त्री-पुरुष समतोल साधणो तर दूरच, उलट स्त्रियांचे प्रमाण आज आहे त्याहून घटेल, असे भाकीत या अभ्यासाने वर्तवले आहे. 
त्यातल्या त्यात एक बरी बातमी एवढीच, की येत्या पाच वर्षात स्त्रियांना बढती मिळून व्यवस्थापनाच्या (निदान) मध्यम स्तरात जाण्याचे त्यांचे प्रमाण वाढेल.
 
चौथे पाऊल
1784 पहिली 
औद्योगिक क्रांती : 
वाफेवर चालणारे यंत्र, यांत्रिक ऊर्जा हे प्रमुख कारक. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात ब्रिटनमध्ये कपडय़ाच्या उद्योगात वाफेवर चालणारी यंत्रे वापरात आली. त्यानंतर वाफेच्या शक्तीवर चालणारे अनेक कारखाने सुरू करण्यात आले. ही पहिली औद्योगिक क्रांती होती. 
1870 दुसरी 
औद्योगिक क्रांती : 
विद्युत ऊर्जा, ठोक उत्पादन पहिल्या क्रांतीनंतर तब्बल शंभर वर्षानी आलेल्या या दुस:या औद्योगिक क्रांतीमध्ये विद्युत ऊज्रेच्या माध्यमातून अमेरिकेचे उद्योगपती हेनरी फोर्ड यांनी वाहन उद्योग क्षेत्रत ठोक स्वरूपात उत्पादन घेण्यास सुरुवात केली.
असेम्ब्ली लाइन प्रॉडक्शन सुरू झाले.
कारखान्यांमध्ये अधिकाधिक उत्पादन आणि जास्तीत जास्त विक्री, असा ट्रेंड निर्माण झाला. 
1969 तिसरी 
औद्योगिक क्रांती : इलेक्ट्रॉनिक्स, संगणक माहिती तंत्रज्ञान
संगणक आणि त्यामागोमाग विकसित झालेल्या माहिती तंत्रज्ञानाने जग बदलण्याचा प्रारंभ. 
 
ाौथे पाऊल
माहिती-तंत्रज्ञान युगाने आणलेल्या बदलांचा झपाटा इतका मोठा होता/आहे की अवघ्या पन्नास वर्षाच्या काळात आता जग नव्या औद्योगिक क्रांतीच्या उंबरठय़ावर उभे ठाकले आहे. एकमेकांशी जोडलेली अगणित संवादसाधने (कनेक्टेड डिव्हायसेस) सुपर स्मार्ट रोबोटिक्स, व्हच्यरुअल रिअॅलिटी अशा अनेकानेक तंत्रज्ञानांचा ‘कन्व्हजर्न्स’ हे या नव्या युगाचे सूत्र असेल.
 
रोजगाराचे ‘भवितव्य’ बदलणारे तंत्रज्ञान
- मोबाइल इंटरनेट
- अतिप्रगत रोबोटिक्स
- इंटरनेट ऑफ थिंग्ज
- व्हच्यरुअल रिअॅलिटी
- थ्रिडी प्रिंटिंग
- नेक्स्ट जनरेशन जिनॉमिक्स
- क्लाउड स्टोअरेज
- चालकविरहित गाडय़ा
- एनर्जी स्टोअरेज
- कॅश/कार्डलेस व्यवहार
- नव्या इंधन स्रोतांचा शोध
- पुनर्निर्माणकृत ऊर्जा (रिन्यूएबल एनर्जी)

Web Title: Breading machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.