रझा अकॅडमीतून महत्त्वाचे पुरावे हाती, पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 05:56 AM2021-11-18T05:56:55+5:302021-11-18T05:57:20+5:30

दगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी  आतापर्यंत ५२  संशयित आरोपींना  अटक करण्यात आली आहे. निरपराध लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी दिली.

Important evidence from Raza Academy, search for office bearers begins | रझा अकॅडमीतून महत्त्वाचे पुरावे हाती, पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू

रझा अकॅडमीतून महत्त्वाचे पुरावे हाती, पदाधिकाऱ्यांचा शोध सुरू

googlenewsNext
ठळक मुद्देदगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी  आतापर्यंत ५२  संशयित आरोपींना  अटक करण्यात आली आहे. निरपराध लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी दिली.

मालेगाव :  रझा अकॅडमीच्या येथील कार्यालयावर टाकलेल्या छाप्यात काही महत्त्वाचे पुरावे हाती लागले आहेत. हे गोपनीय  पुरावे न्यायालयात सादर केले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दगडफेक, मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी  आतापर्यंत ५२  संशयित आरोपींना  अटक करण्यात आली आहे. निरपराध लोकांवर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जाणार नसल्याची माहिती जिल्हा पोलीसप्रमुख सचिन पाटील यांनी दिली.  सोमवारी मध्यरात्री रझा अकॅडमीच्या कार्यालयावर  छापा टाकून काही महत्त्वाची कागदपत्रे तसेच बंद संदर्भातील पत्रके, संगणक व इतर साहित्य जप्त केले होते. घटनेला चिथावणी देणाऱ्या तसेच  मुख्य सूत्रधार व रझा अकॅडमीच्या फरार पदाधिकाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. 

Web Title: Important evidence from Raza Academy, search for office bearers begins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.