आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 10:57 AM2018-09-17T10:57:07+5:302018-09-17T10:58:53+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 23 सप्टेंबरला पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच पुरविणार आहेत. या योजनेची सुरुवात झारखंडमधून केली जाणार आहे.

Is your name in pradhanmantri jan arogya yojana? Check that ... | आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...

आयुष्यमान योजनेत तुमचे नाव आहे का? असे तपासा...

googlenewsNext

पंतप्रधाननरेंद्र मोदी हे येत्या 23 सप्टेंबरला पंतप्रधान जन आरोग्य योजनेद्वारे 10 कोटी कुटुंबांना 5 लाखांचे आरोग्य कवच पुरविणार आहेत. या योजनेची सुरुवात झारखंडमधून केली जाणार आहे. या योजनेचा लाभ सामाजिक-आर्थिक जनगणनेवर मिळणार आहे. यासाठी 30 एप्रिलपासून एक मोहीम चालविण्यात आली होती. याद्वारे या योजनेसाठी पात्र असलेले नागरिकांची माहिती, मोबाईल नंबर आणि रेशन कार्डचा नंबर गोळा करण्यात आले. यामध्ये आपल्या कुटुंबाचे नाव आहे का, हे जाणून घेण्यासाठी mera.pmjay.gov.in या वेबसाईटवर जाऊन किंवा हेल्पलाईन नंबर 14555 यावर तुमच्या मोबाईलवरून फोन करावा लागणार आहे. 

या वेबसाईटवर गेल्यानंतर तुमचा सुरु असलेला मोबाईलनंबर आणि स्क्रीनवर दाखवत असलेली अक्षरे (कॅप्चा) भरल्यानंतर ओटीपीसाठी Verify OTP वर क्लिक करावे. यानंतर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल. त्या मेसेजमध्ये 6 आकडी ओटीपी असेल. ओटीपी टाकल्यानंतर पुढाल पानावर तुमची माहीती टाकून जन आरोग्य योजनेमध्ये तुमचे नाव आहे की नाही, हे पाहू शकता. 


तीन प्रकारची माहिती टाकून तपासा
या वेबसाईटवर तीन प्रकारची माहिती टाकून शोधता येते. पहिला मोबाईल नंबर किंवा रेश कार्ड नंबर, दुसऱा एसईसीसी नाव आणि तिसरा आरएसबीवाय युआरएन. यामध्ये आपले नाव नसल्यास जिल्हा रुग्णालय, तालुका रुग्णालयामध्ये आयुष्यमान मित्रांकडे संपर्क साधायचा आहे. 


ही योजना सामाजिक-आर्थिक जाती जनगणना (एसईसीसी)च्या आधारावर लागू करण्यात येणार आहे. 30 एप्रिलपर्यंत ज्या लोकांचे मोबाईल नंबर, रेश कार्ड ग्रामपंचायत स्तरावर जमा करण्यात आले, त्यांचीच नावे यामध्ये दिसणार आहेत. जर एडीसीडीच्या मोहिमेवेळी माहिती दिली असेल तरीही नाव आले नसेल तर एसईसीसी नाव म्हणून पर्याय दिसेल. त्यावर सर्च करून आपली योग्यता शोधू शकता. यानंतरही तुमचे नाव दिसत नसेल तर जवळच्या आयुष्यमान मित्रांकडे संपर्क साधावा लागणार आहे. 

जर तुमचे नाव या योजनेमध्ये असेल, तर पुढील वेबपेजवर Get SMS असे बटन दाबावे. यापूर्वी तेथे तुमचा मोबाईल नंबर टाकावा. यानंतर तुम्हाला एचएचआईडी नंबर/आरएसबीवआई यूआरएन नंबर असलेला संदेश प्राप्त होईल. याचा वापर भविष्यात कोणताही आजार झाल्यास त्यावरील उपचारावर करता येणार आहे. 

या योजनेचा लाभ ग्रामीण भागातील 8.03 आणि शहरी भागातील 2.33 कोटी लोकांना मिळणार आहे.
 

Web Title: Is your name in pradhanmantri jan arogya yojana? Check that ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.