यंदा थंडी कमीच राहणार, हवामान विभागाचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 05:26 AM2018-12-04T05:26:02+5:302018-12-04T05:26:09+5:30

हवामान विभागाने डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यानचा तापमानाचा अंदाज जाहीर केला

This year, cold weather will remain low, weather forecast | यंदा थंडी कमीच राहणार, हवामान विभागाचा अंदाज

यंदा थंडी कमीच राहणार, हवामान विभागाचा अंदाज

Next

मुंबई/पुणे : हवामान विभागाने डिसेंबर २०१८ ते फेब्रुवारी २०१९ दरम्यानचा तापमानाचा अंदाज जाहीर केला असून त्यानुसार यंदा देशभरात किमान तापमान बहुतांश ठिकाणी सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ थंडीचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे़ उत्तर भारतातील थंड हवामानाच्या परिसरात यंदा किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ०़५ ते -०़५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे़
मान्सून मिशनच्या अंतर्गत हवामान विभागाच्या वतीने २०१६ पासून उष्ण आणि थंड हवामानाचा अंदाज देण्यास सुरुवात केली आहे़ त्यानुसार दीर्घकालीन अंदाजानुसार यंदा डिसेंबर ते फेब्रुवारीदरम्यान बहुतांश भागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ०़५ अंश सेल्सिअसने अधिक राहण्याची शक्यता आहे़ जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल, उत्तराखंड, छत्तीसगड या हवामान विभागात किमान तापमान सरासरीच्या तुलनेत ०़५ ते -०़५ अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे़
थंड प्रदेशातील किमान तापमान सरासरीपेक्षा अधिक राहण्याची शक्यता ३९ टक्के इतकी आहे़ त्यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा, ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, उत्तर प्रदेश, राजस्थान, जम्मू काश्मीर, हरियाना, दिल्ली, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, पंजाब या राज्याचा त्यात समावेश आहे़ पॅसिफिक महासागरातील पाण्याचे तापमान सध्या सरासरीपेक्षा अधिक असून ग्लोबल क्लॉमेट मॉडेलच्या इंडिकेटनुसार हिवाळी हंगामात एन निनो विकसित होण्याची शक्यता आहे़
नगर सर्वाधिक थंड
मुंबई वगळता राज्यातील बहुतांशी शहरांच्या किमान तापमानाचा पारा खाली घसरत आहे. सोमवारी सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १०.५ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले दुसरीकडे मुंबईच्या किमान तापमानाचा पारा २० अंशाच्या खाली घसरत नसला तरी भल्या पहाटे मात्र मुंबईकरांना आल्हाददायक थंडी अनुभवाला मिळत आहे.
>मराठवाड्यात पावसाची शक्यता
मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात बुधवार, ५ डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण, गोवा, विदर्भात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. ६ आणि ७ डिसेंबर रोजी गोव्यासह संपूर्ण राज्यात हवामान कोरडे राहील. मुंबई आणि आसपासच्या परिसरात आकाश अंशत: ढगाळ राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३३, १९ अंशाच्या आसपास राहील, असा अंदाज हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.
>मुंबई ढगाळ : मुंबईच्या किमान तापमानाचा पारा २० अंशाच्या खाली घसरत नसला तरीदेखील मुंबईकरांना भल्या पहाटे काही अंशी थंडीचा सामना करावा लागत आहे. पहाटेची थंडी सोडली तर मुंबईकरांची दुपार मात्र तप्तच आहे. मागील दोन दिवसांपासून मुंबईचे हवामान ढगाळ नोंदविण्यात येत आहे.

Web Title: This year, cold weather will remain low, weather forecast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.