जंगली हत्ती पकडण्याचे सारथ्य ‘भीम’कडे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2017 04:10 AM2017-10-29T04:10:58+5:302017-10-29T04:11:09+5:30

सिंधुदुर्गमध्ये पकडण्यात आलेल्या तीन जंगली हत्तींपैकी एकमेव जिवंत राहिलेल्या भीम हत्तीचे कर्नाटकातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता येथे आलेल्या जंगली हत्तींना पकडण्याचे काम भीम करणार आहे.

Wild elephant caught hold of 'Bhima'! | जंगली हत्ती पकडण्याचे सारथ्य ‘भीम’कडे!

जंगली हत्ती पकडण्याचे सारथ्य ‘भीम’कडे!

googlenewsNext

अनंत जाधव
सावंतवाडी : सिंधुदुर्गमध्ये पकडण्यात आलेल्या तीन जंगली हत्तींपैकी एकमेव जिवंत राहिलेल्या भीम हत्तीचे कर्नाटकातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता येथे आलेल्या जंगली हत्तींना पकडण्याचे काम भीम करणार आहे.
माणगाव खोºयात २०१५ मध्ये हत्ती पकडण्याची मोहीम राबविण्यात आली होती. त्यासाठी कर्नाटकातील शिमोगा येथून तीन प्रशिक्षित हत्ती आणण्यात आले होते. या प्रशिक्षित हत्तींनी तीन जंगली हत्तींना पकडले. त्यांचे भीम, समर्थ व गणेश असे नामकरण करण्यात आले होते. पण पकडल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच समर्थ व गणेश हे दोन हत्ती मरण पावले, तर भीम हा एकमेव हत्ती जिवंत होता. येथील हवामान हत्तीसाठी पोषक नाही तसेच येथे प्रशिक्षित करण्यासाठी विशेष पथक नाही. एखाद्या हत्तीला गंभीर आजार झाला, तर उपचाराची सोय नाही. त्यामुळे वनविभागाने भीम हत्तीला प्रशिक्षणासाठी शिमोगा येथे पाठविले होते. आता भीमचे दोन वर्षांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे.
सध्या कोल्हापूर व सिंधुदुर्गमध्ये चार ते पाच जंगली हत्तींनी घुसखोरी केली आहे. वनविभागाने त्यांना
अनेक वेळा पुन्हा कर्नाटकात पाठविण्याचा प्रयत्न केला; पण ते शक्य होत नाही. त्यामुळे शासनाने आता हत्ती पकडा मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला असून याचे सारथ्य भीम करणार आहे.

कोल्हापूर व सिंधुुदुर्गच्या सीमेवर घाटकरवाडी येथे कायमस्वरूपी ‘एलिफंट कॅम्प’ तयार करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. याच अनुषंगाने उद्या (३० आॅक्टोबर) आंबोली येथे वन अधिकारी व कर्मचाºयांची कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत तज्ज्ञ एलिफंट कॅम्पबाबत माहिती देणार आहेत.
- विजय सुर्वे,
साहाय्यक वनसंरक्षक

Web Title: Wild elephant caught hold of 'Bhima'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.