बोअरवेलमधून जेव्हा पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येतं.... ! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 07:55 PM2018-09-10T19:55:13+5:302018-09-10T19:56:52+5:30

एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली. 

when petrol came From the borewell ....! | बोअरवेलमधून जेव्हा पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येतं.... ! 

बोअरवेलमधून जेव्हा पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येतं.... ! 

Next
ठळक मुद्देडुडूळगावच्या अजब घटनेने सुखद धक्का 

पिंपरी : डुडुळगाव येथे शिवाजी तळेकर यांच्या जागेतील बोअरवेलला (हातपंपाला) पाण्याऐवजी चक्क पेट्रोल येऊ लागल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. बोअरवेलच्या (हातपंप) नळावाटे पेट्रोल येऊ लागताच तळेकर यांच्या घरातील लोकांनी तेथे बादल्या लावल्या. थोडा वेळ जाताच नेमका काय प्रकार आहे, याचा उलगडा झाला. एकीकडे पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वच स्तरातुन संतापाची लाट उसळली असताना पिंपरी चिंचवडमधील डुडुळगावात चक्क बोअरवेलला पेट्रोल येऊ लागले ही घटना थोड्या वेळासाठी का होईना नागरिकांना सुखद देणारी ठरली. 
चऱ्होलीजवळील डुडूळगाव येथे तळेकर यांच्या घराजवळ बोअरवेल आहे. रविवारी सकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे त्यांच्या घरातील मंडळी पाणी भरण्यासाठी बोअरवेलजवळ गेले. प्लास्टिक बादली नळाखाली लावली. बोअरवेलला हापसा दिला असता, केशरी रंगाचा द्रव पदार्थ नळावाटे बाहेर पडू लागला. रंगीत पाणी कसे येऊ लागले. हे पाहण्यासाठी बादली हातात घेतली असता,चक्क पेट्रोलचा वास येऊ लागला. तळेकर यांच्या बोअरवेलला हापसा दिल्यानंतर पेट्रोल येत असल्याची वार्ता वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली. कुतुहलापोटी नागरिकांनी तळेकर यांच्या घराकडे धाव घेतली. बोअरवेलला पेट्रोल येत असल्याचा अजब प्रकार व्हॉटसअ‍ॅपवरून व्हायरल झाला. त्यामुळे गर्दी आणखी वाढली. सुरूवातीला काही मिनिटासाठी बोअरवेलच्या नळावाटे पेट्रोल आले. नंतर मात्र पुन्हा पाणी येऊ लागले. नेमका प्रकार काय आहे, हे शोधण्याचा प्रयत्न केला असता, तळेकर यांच्या घरापासून काही अंतरावर पेट्रोलपंप आहे. या पेट्रोलपंपाच्या जमिनीखालील टाकीला गळती  होत असल्याने जवळच असलेल्या बोअरवेलच्या खडयात काही अंशी पेट्रेल गळती झाली. ही बाब पेट्रोलपंप चालकाच्याही लक्षात आली. त्यांनी पेट्रोल टाकीच्या गळतीवर तातडीने उपाययोजना केली.
देशात सर्वत्र पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. पुण्यात पेट्रोलचा दर प्रतिलिटरला ८८ रुपये झाला आहे. अशीच परिस्थिती अन्य देशातील शहरात तसेच विविध राज्यांमध्ये आहे. इंधनवाढीचा परिणाम दैनंदिन वापरात येणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीवर झाला आहे. परिणामी महागाईची झळ सर्वांना बसू लागली आहे. सरकारच्या विरोधात नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलन करून निषेध नोंदवत आहेत. पेट्रोल दरवाढीमुळे देशात सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. अशातच पिंपरी चिंचवडमध्ये बोअरवेलच्या नळाला पाण्याऐवजी पेट्रोल येऊ लागल्याने थोडावेळ का होईना नागरिकांना दिलासा मिळाला. 

Web Title: when petrol came From the borewell ....!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.