राज ठाकरे यांच्यासोबतच्या त्या १७ मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:15 AM2017-10-06T05:15:47+5:302017-10-06T05:16:15+5:30

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली.

What happened in the 17-minute meeting with Raj Thackeray? | राज ठाकरे यांच्यासोबतच्या त्या १७ मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

राज ठाकरे यांच्यासोबतच्या त्या १७ मिनिटांच्या बैठकीत काय घडले?

googlenewsNext

डोंबिवली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह १७ जणांच्या शिष्टमंडळाच्या बैठकीत गुरुवारी मध्य-पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के. गुप्ता, डी.के. शर्मा यांनी विविध मुद्यांववर चर्चा केली. सतरा मिनिटे ही बैठक झाली. त्यात प्रामुख्याने रेल्वे स्थानकांतील फेरिवाले हटवावेत, १५ दिवसात जर ते काम झाल नाही तर मनसेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील. तसेच जे निवेदन दिले आहे त्यानुसार महिनाभरात प्रगती झाली नाही तर जे होइल त्याला रेल्वे प्रशासन जबाबदार असेल, अशी तंबी ठाकरे यांनी दिली.

दुपारी २ वाजून २१ मिनिटांनी बैठक सुरू झाली. त्यात प्रवासी संघटनांपैकी उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे महासचिव अनिकेत घमंडी, उपाध्यक्षा लता अरगडे, विश्वनाथ धात्रक, कर्जतचे पंकज ओस्वाल, पश्चिम रेल्वेच्या झेडआरयूसीसीचे मेहुल व्यास यांना राज ठाकरेंनी रेल्वेच्या व्यथा मांडण्यास सांगितले. त्यानूसार प्रत्येकाने स्थानकांवरील विविध समस्यांवर झोड उठवण्यात आली.

आॅडीट समितीत रेल्वेने स्थानिक प्रवाशांना सामावून घेणे आवश्यक होते, पण तसे झाले नाही. त्याबद्दल संघटनांनी नाराजी व्यक्त केली. त्यानंतर ठाकरे यांनी तातडीने रेल्वे अधिकाºयांना जसा पत्रव्यवहार संघटना करतात तसा तुम्ही किती वेळा केला आहे. केवळ नोंदी करायच्या पुढे काही नाही असे का केले जाते. यापुढे हे सहन केले जाणार नाही हे स्पष्ट केले. महाव्यवस्थापक गुप्ता, शर्मा या दोघांनीही फेरिवाले तातडीने हटवले जातील पण जेथे स्कायवॉक आहेत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था त्यांची जबाबदारी ढकलत असल्याचे निदर्शनास आणले, त्यावर ठाकरेंनी रेल्वेने त्यांची जबाबदारी पूर्ण करावी बाकी ठिकाणी आम्ही बघू असे स्पष्ट केले.

Web Title: What happened in the 17-minute meeting with Raj Thackeray?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.