विश्वनाथ घाणेगावकरचा हेका..."वोटकर" चा धर ठेका !

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 04:46 PM2019-04-12T16:46:19+5:302019-04-12T17:29:04+5:30

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर आणि त्याच्या टीमने तयार केलेला "किसी को भी कर पर वोट कर" हे रॅप साँग सोशल मिडियावर वायरल होत आहे. "वोट से बदल कल" असे सांगताना मतपेटीतून तुम्ही भविष्य घडवू शकता, असा संदेश यातून देण्यात आला आहे.  तसेच मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे.

Vishwanath Ghanegaonkar's created rap song | विश्वनाथ घाणेगावकरचा हेका..."वोटकर" चा धर ठेका !

विश्वनाथ घाणेगावकरचा हेका..."वोटकर" चा धर ठेका !

Next

मुंबई – लोकसभा निवडणुकीत सर्वांनी मतदान करून लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे यासाठी अनेक मार्गाने मतदार जागृती करण्यात येत आहे. यासाठी प्रशासन जेवढे प्रयत्न करत आहे, तेवढ्याच प्रमाणात युवक आणि युवती देखील अनोख्या मार्गाने मतदार जागृतीसाठी पुढाकार घेताना दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर या तरुणाने देखील यात खारीचा वाटा उचलला आहे. नुकताच अभिनेता रणवीर सिंहचा गल्ली बॉय चित्रपट येऊन गेला. त्यात रॅप म्युझीकवर प्रकाश टाकण्यात आला. त्यामुळे तरुणांमध्ये रॅप सॉन्गची क्रेझ वाढली आहे. तोच धागा पकडून विश्वनाथ याने आपल्या मित्रांच्या साथीत तरुणांना मतदानासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न रॅप सॉन्गच्या माध्यमातून केला आहे. 

निवडणुकीत मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्ष वेगवेगळी शक्कल लढवत असतात. केवळ  राजकीय पक्षांचे उमदेवार नव्हे तर, निवडणूक आयोगाच्या सूचनेप्रमाणे जिल्हा प्रशासनातर्फे सुद्धा विविध माध्यमातून मतदान जनजागृती करण्यात येते. जिल्हा प्रशासन वृत्तपत्रात जाहिरात देऊन, पथनाट्यच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न करत असते.  मात्र आता मतदारांपर्यंत एका क्षणात पोहचवण्याची क्षमता सोशल मिडीयामध्ये आहे.

लोकशाही बळकट करण्यासाठी चांगले उमेदवार निवडून येणे गरजेचे आहे. पण यासाठी नागरिकांनी मतदान करणे अपेक्षित आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे यासाठी वेगवेगळ्याप्रकारे योजना राबवून जिल्हा प्रशासन जनजागृती करत असताना सामाजिक भान म्हणून काही युवक यात आपले योगदान देत आहेत. 

पुण्यात शिक्षण घेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील विश्वनाथ घाणेगावकर आणि त्याच्या टीमने तयार केलेला "किसी को भी कर पर वोट कर" हे रॅप साँग सोशल मिडियावर वायरल होत आहे. "वोट से बदल कल" असे सांगताना मतपेटीतून तुम्ही भविष्य घडवू शकता, असा संदेश यातून देण्यात आला आहे.  तसेच मतदान करण्याचे आवाहन केले जात आहे. कुणालाही करा, पण मतदान करा, अस या गाण्याचे बोल सांगतात.  या रॅप साँगला फेसबुक आणि यु ट्यूबवर पसंती मिळत आहे. 

सरकार लाखो रुपये खर्च करून मतदान करण्यासाठी जाहिरात बाजी करत आहे. मात्र लोकांपर्यंत लवकर पोहचेल आणि तरुणांना आवडेल अशा पद्धतीने मतदान जनजागृतीसाठी हे गीत बनवल्याचे विश्वानाथने सांगितले. 

या गाण्याचे दिग्दर्शन अविनाश मल्होत्रा, लिरीक्स विश्वनाथ घाणेगावकर, म्युझिक दिग्दर्शन ऋषीकेश बनसोडे, रत्नदीप कांबळे यांनी केले. तसेच गाण्यासाठी सागर पांढरे, सुमीत बाविस्कर, दिनेश जाधव, अक्षय आणि ऋषीकेश दळवी यांचे सहकार्य लाभले आहे.

Web Title: Vishwanath Ghanegaonkar's created rap song

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.