वाहतूक शाखेच्या हवालदाराला मारहाण

By Admin | Published: May 11, 2017 03:07 AM2017-05-11T03:07:11+5:302017-05-11T03:07:11+5:30

कळवा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार अजय शिरसाठ यांना मारहाण करणाऱ्या योगेश शिंदे (२४, रा. भिवंडी) या टेम्पोचालकाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.

Traffic division strikes the Hawkwar | वाहतूक शाखेच्या हवालदाराला मारहाण

वाहतूक शाखेच्या हवालदाराला मारहाण

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : कळवा वाहतूक नियंत्रण शाखेचे हवालदार अजय शिरसाठ यांना मारहाण करणाऱ्या योगेश शिंदे (२४, रा. भिवंडी) या टेम्पोचालकाला कळवा पोलिसांनी अटक केली आहे.
कळव्यातील शिवाजी चौक येथे९ मे रोजी दुपारी शिरसाठ हे वाहतुकीचे नियमन करीत होते. त्याच वेळी मुंबईकडून येणाऱ्या एका टेम्पोला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. टेम्पोचालक शिंदे याने मात्र त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करून टेम्पो तसाच पुढे नेला. याबाबत शिरसाठ यांनी त्याला विचारणा केली असता चालक शिंदे याने खाली उतरून शर्टाची कॉलर पकडून त्यांना मारहाण केली.

Web Title: Traffic division strikes the Hawkwar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.