आजचा दिवस मोर्चांचा ; मनसे, अंगणवाडी, पालिका कर्मचा-यांचे मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 05:53 AM2017-10-05T05:53:08+5:302017-10-05T05:54:33+5:30

मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महापालिका कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी अशा तीन मोठ्या संघटनांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे.

Today's day; MNS, Anganwadi, municipal employees front | आजचा दिवस मोर्चांचा ; मनसे, अंगणवाडी, पालिका कर्मचा-यांचे मोर्चे

आजचा दिवस मोर्चांचा ; मनसे, अंगणवाडी, पालिका कर्मचा-यांचे मोर्चे

Next

मुंबई : मुंबईत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महापालिका कर्मचारी आणि अंगणवाडी कर्मचारी अशा तीन मोठ्या संघटनांनी राज्य सरकारच्या धोरणांविरोधात मोर्चाची हाक दिली आहे. त्यामुळे मुंबईसाठी गुरुवार हा मोर्चांचा दिवस ठरणार असून, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
एल्फिन्स्टन पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीचा निषेध व्यक्त करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बºयाच काळानंतर मोठ्या आंदोलनाची घोषणा केलेली आहे. बुलेट ट्रेनला विरोध करत आधी रेल्वे प्रवाशांसाठी पुरेशा सोयी-सुविधा देण्याची त्यांची मागणी आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपर्यंत मनसेला मोर्चा काढण्याची परवानगी पोलिसांनी दिलेली नव्हती.
दुसरीकडे महापालिका कर्मचाºयांच्या तब्बल ४० मान्यताप्राप्त संघटनांनी एकत्र येत मुंबई मनपा आयुक्त अजय मेहता यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. सर्व संघटनांच्या मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीने आयुक्तांविरोधात गुरुवारी महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चाचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर महिन्याभरापासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचाºयांनीही गुरुवारी सरकारविरोधात राज्यात
जेलभरो आंदोलनाची हाक दिली आहे. त्याअंतर्गत मुंबईतही तीव्र आंदोलनाचा इशारा अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने दिला आहे.

‘अंगणवाडी ताई’ करणार जेलभरो
मानधनवाढ, पोषण आहाराच्या दर्जात सुधारणा या प्रमुख मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचाºयांनीही गुरुवारी रस्त्यावर उतरण्याची घोषणा केलेली आहे. शिवसेनेसह प्रमुख पक्षांनी दिलेल्या पाठिंब्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे बळ वाढले असल्याचा दावा समितीने केला आहे. त्यामुळे सीएसएमटी येथे अटक करून घेत ‘अंगणवाडी ताई’ आपली ताकद दाखविणार आहेत.

४० हजार रुपये बोनसची मागणी करत पालिका कर्मचाºयांनी आयुक्तांविरोधात महापालिका मुख्यालयावर सकाळी ११ वाजता धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे.
कायम सेवेतील कामगार कमी करून कंत्राटीकरणाची पद्धत अवलंबणारे महापालिका आयुक्त कामगारविरोधी धोरण राबवत असल्याचे समन्वय समितीचे म्हणणे आहे.
या गोष्टीचा रोष व्यक्त करताना बायोमेट्रीक पद्धत रद्द करा, वैद्यकीय सुविधा लागू करा, अशा विविध मागण्यांसाठी महापालिका कर्मचारी सीएसएमटी येथे शक्तिप्रदर्शन करतील.

राज ठाकरे यांनी पुकारलेले आंदोलन यशस्वी करण्यासाठी मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे लोकलमध्ये चढून बुधवारी मोर्चाबाबत जनजागृती करताना दिसले. खुद्द राज ठाकरे यांनीही बुधवारी फेसबुकवर पोस्ट टाकत हा मोर्चा केवळ मनसेचा नसून, सर्वसामान्यांच्या लढ्यासाठी असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील मेट्रो सिनेमागृहासमोरून सकाळी ११.३० वाजता सुरू होणारा मोर्चा पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयावर धडक देईल. दरम्यान, मोर्चाला कोणतेही गालबोट न लावता शिस्तीत काढण्याचे आवाहन राज यांनी केले आहे.

Web Title: Today's day; MNS, Anganwadi, municipal employees front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.