काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक : वर्ल्ड ट्रस्ट डायमनी संस्थेवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 05:06 PM2018-12-17T17:06:13+5:302018-12-17T17:07:23+5:30

पुण्यात जवळपास १ हजार महिलांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचा अंदाज असून अजूनही तक्रार देण्यासाठी महिला येत आहेत़.

Thousands of women have been cheated by the excuse of work | काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक : वर्ल्ड ट्रस्ट डायमनी संस्थेवर गुन्हा दाखल

काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक : वर्ल्ड ट्रस्ट डायमनी संस्थेवर गुन्हा दाखल

पुणे : काम देण्याच्या बहाण्याने हजारो महिलांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली वर्ल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेवर पुण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 
महिलांचा गट स्थापन करुन त्यांना कापडी पिशव्या बनविण्याचे काम देण्याचा बहाणा करुन त्यांच्याकडून सदस्य फीच्या नावाखाली पैसे गोळा करुन दिलेल्या मालाचे पैसे न देता पोबारा केलेल्या या संस्थेविरोधात आतापर्यंत १ हजार महिलांनी भारती विद्यापीठ पोलिसांकडे तक्रार दिली आहे़.  


                 कंपनीचा सुत्रधार चेअरमन मनीष लोकरस त्याच्या सहायक जयश्री कोपर्डेकर आणि सुनिता दास अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत़. हा प्रकार जून ते २० नोव्हेंबर २०१८ दरम्यान घडला आहे़.  पुण्यात जवळपास १ हजार महिलांची अशाप्रकारे फसवणूक झाल्याचा अंदाज असून अजूनही तक्रार देण्यासाठी महिला येत आहेत़.  ६५१ रुपये ही छोटीशी रक्कम असल्याने महिलांनीही काम मिळत असल्याने कोणी अधिक चौकशी केली नाही़ पण, जेव्हा तयार केलेल्या पिशव्या कंपनीला पाठविल्यानंतरही पैसे मिळत नसल्याचे पाहून लोकांनी जयश्री कोपर्डेकर, मनीष लोकरस यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला़ तेव्हा त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली व कार्यालय बंद केल्याने लोकांचा संशय वाढला़.  
याबाबत पोलिसांनी सांगितले की, कात्रज येथे मनीष लोकरस याने वल्ड ट्रस्ट डाय मनी संस्थेचे कार्यालय सुरु केले होते़. त्या भागातील महिलांना तुम्ही गट स्थापन करा़. त्यांना आम्ही कागदी व कापडी पिशव्या, अगरबत्ती, मेणबत्ती व द्रोण तयार करण्यासारखे गृहउद्योग सुरु करुन देऊ़. तुम्हाला मालाचा पुरवठा करुन व तुमचा मालही घेऊ असे सांगितले़.  त्यासाठी तुम्ही सभासद फी म्हणून ६५१ रुपये भरा असे सांगितले़. याशिवाय  त्याने काही महिलांना आमच्याकडे पैसे गुंतवा तुम्हाला कमी कालावधीमध्ये जास्त पैसे मिळवून देतो, आकर्षक व्याज देतो, असे सांगून त्यांच्याकडून रोख स्वरुपात २० हजार, ३० हजार रुपये घेतले़. 


                  महिलांच्या एका १५० जणींच्या गटाने प्रत्येकी ६५१ रुपये प्रमाणे ९७ हजार रुपये दिले़ तसेच महिलांनी केलेल्या कामाचा पगार न देता व महिलांची गुंतविलेली अंदाजे १ लाख ६५० रुपये परत न करता महिलांची फसवणूक केली़.  या महिलांपैकी गटप्रमुखांना त्याने तुम्ही कच्चा माल तयार करण्यासाठी सुरुवातीला पैसे टाका़ तुम्ही पिशव्या बनविल्या की त्याच्याबरोबर तुमचे पैसे देतो, असे सांगितले होते़. त्याप्रमाणे गटप्रमुख महिलांनी स्वत: पैसे गुंतवणुक पिशव्या, मेणबत्त्या तयार केल्या़ त्या त्यांनी वर्ल्ड ट्रस्ट डाय मनीच्या कार्यालयात नेऊन दिल्या़ पण त्याचे पैसे त्याने दिले नाही़ या कार्यालयात त्याने नेमलेल्या कर्मचाऱ्यांना काही महिने पगार दिला़. त्यानंतर २० नोव्हेंबरपासून हे कार्यालय बंद पडले़. अशाच प्रकारे मनीष लोकरस याने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यालये उभारुन सुमारे ४५ हजार महिलांकडून ६५१ रुपये सभासद फी म्हणून रोख स्वरुपात गोळा केली आहे़. कर्जत, यावल, कराड येथे आतापर्यंत गुन्हे दाखल केले आहेत़. कर्जत पोलिसांनी यापूर्वी जयश्री कोपर्डेकर यांना अटक केली होती़ परंतु, त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे़.  त्यानंतर मुख्य सुत्रधार मनीष लोकरस याला सांगलीतून अटक केली आहे़.  न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली असून त्यानंतर त्याला अटक करण्यात येणार असल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विष्णु पवार यांनी सांगितले़.  

Web Title: Thousands of women have been cheated by the excuse of work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.