...तर एसटी कामगार पुन्हा संपावर - ताटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 05:37 IST2017-12-05T05:37:23+5:302017-12-05T05:37:31+5:30
एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे अपेक्षित वेतनवाढ मिळण्यासाठी कामगार संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर उच्चस्तरीय समितीने समाधानकारक निर्णय

...तर एसटी कामगार पुन्हा संपावर - ताटे
कोल्हापूर : एस.टी. कामगारांच्या वेतनवाढीबाबत उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली आहे. या समितीकडे अपेक्षित वेतनवाढ मिळण्यासाठी कामगार संघटनेने दिलेल्या प्रस्तावावर उच्चस्तरीय समितीने समाधानकारक निर्णय न घेतल्यास न्याय हक्कांच्या लढाईसाठी एस. टी. कामगारांना पुन्हा ‘बेमुदत संपा’चे हत्यार उपसावे लागेल, असा इशारा, महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेचे जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिला.
ताटे म्हणाले, न्यायालयाच्या आदेशाचा सन्मान करून एस. टी. संघटनांनी संप मागे घेतला. न्यायालयाच्या आदेशानुसार स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीपुढे एस. टी. संघटनेने वेतनवाढीचा प्रस्ताव ३१ आॅक्टोबरला सादर केलेला आहे. या उच्चस्तरीय समितीने १५ नोव्हेंबर २०१७पर्यंत वेतनवाढीसंबंधात अंतरिम अहवाल व दि. २२ डिसेंबरपर्यंत अंतिम अहवाल सादर करणे अपेक्षित होते. मात्र, उच्चस्तरीय समितीने अंतरिम अहवाल सादर केलेलाच नाही.