धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2019 12:06 PM2019-02-16T12:06:36+5:302019-02-16T12:22:02+5:30

पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला.

Terror organisations who have committed this crime, they will be punished - Narendra Modi | धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी

धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा; पुलवामाच्या गुन्हेगारांना कधी, कशी आणि कुठे शिक्षा द्यायची ते लष्कर ठरवेल - नरेंद्र मोदी

ठळक मुद्देपुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केलाधीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील

यवतमाळ - पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यामुळे देशभरात असलेल्या संतापाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहशतवाद्यांविरोधात कठोर कारवाई करण्याचा पुनरुच्चार केला. धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असे नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला आहे. दरम्यान,  यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे जनसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी पुलवामा हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांना रोखठोक इशारा दिला आहे. ''पुलवामा येथील झालेल्या घटनेनंतरचा जनतेतील असंतोष मी समजू शकतो.  या भ्याड हल्ल्यात महाराष्ट्रातील जवानही शहीद झाले आहेत. मी पुन्हा सांगतो, शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही.  दहशतवादी संघटनांची जो गुन्हा केला आहे तो विचारात घेता त्यांनी कितीही लपण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना शोधून शिक्षा दिली जाईल. तुम्ही धीर धरा, जवानांवर विश्वास ठेवा, पुलवामाच्या गुन्हेगारांना शिक्षा, कशी, कुठे दिली जाईल ते आमचे जवान ठरवतील, असा इशाराच मोदी यांनी दिला. 


 यावेळी २०१४ मध्ये याच मतदारसंघातील दाभडी गावात ‘चाय पे चर्चा’ कार्यक्रमाला येऊन गेल्याचे मोदींनी स्मरण करून दिले. दाभडीला शेतक-यांना दिलेले आश्वासन पूर्ण केल्याचे मोदी यांनी सांगितले. गेल्या साडेचार वर्षात शेकडो योजनांचा शिलान्यास केल्याचे मोदी म्हणाले. आदिवासी मुलांनी एव्हरेस्ट सर केल्याचे सांगितले. 

दरम्यान, पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात तीन हजार घरकुलांचे काम पूर्ण झाले आहे. त्यातील दोन महिलांना प्रातिनिधीक स्वरूपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते घरकुलाच्या चाबीचे वितरण करण्यात आले. शिवाय गवंडी कामाचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या कारागिरांना मोदींच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. यावेळी नागपुरातील अजनी ते पुणे या हमसफर एक्सप्रेसचा शुभारंभ मोदी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. त्याचे थेट प्रेक्षपण करण्यात आले. बचत गटासाठी भाजपा सरकारने आणलेल्या योजनांची चित्रफित कार्यक्रमस्थळी दाखविली जात आहे.

Web Title: Terror organisations who have committed this crime, they will be punished - Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.