राज्यात तापमानाचा पारा लागला वाढू, यवतमाळमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक तापमान 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2019 12:00 PM2019-03-11T12:00:37+5:302019-03-11T12:01:01+5:30

मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़.

The temperature will increased in the state, the highest temperature recorded in Yavatmal | राज्यात तापमानाचा पारा लागला वाढू, यवतमाळमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक तापमान 

राज्यात तापमानाचा पारा लागला वाढू, यवतमाळमध्ये नोंदवले गेले सर्वाधिक तापमान 

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाडयात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता

पुणे : राज्यात निवडणुका जाहीर झाल्यानंतर आता राजकीय वातावरण तापू लागले असतानाच आता वातावरणही तापू लागले आहे. मराठवाड्यात सोमवारी तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे़ राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान यवतमाळ येथे ३९ अंश सेल्सिअस तर सर्वात कमी किमान तापमान गोंदिया येथे १४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़. 
 मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे़. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली़ कोकण, गोव्याच्या काही भागात किंचित घट झाली आहे़ .तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किंचित वाढ झाली आहे़. 
पश्चिम उत्तर प्रदेश, हरियाना, चंदीगड, जम्मू आणि काश्मीर येथे विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे़. मराठवाड्यात ११ मार्चला तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़. १२ ते १४ मार्च दरम्यान विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे़ .

राज्यातील प्रमुख शहरातील कमाल तापमान (अंश सेल्सिअस) पुणे ३६.६ , लोहगाव ३७.७ , जळगाव ३६, कोल्हापूर ३६.८ , महाबळेश्वर ३२.३, मालेगाव ३८.६ नाशिक ३४.९, सांगली ३७.८, सातारा ३६.७ सोलापूर ३८.९ , मुंबई ३१.२ , सांताक्रुझ ३२.६ , अलिबाग २९.४ रत्नागिरी ३३. ४.  पणजी३२. ४,  डहाणु ३१. ८, औरंगाबाद ३५़७, परभणी ३८.४, नांदेड ३८, बीड ३८, अकोला ३७.२, अमरावती३७.२ बुलढाणा ३२. १ , ब्रम्हपुरी ३८, चंद्रपूर ३८.२ , गोंदिया ३३.४ , नागपूर ३८, वाशिम ३८, वर्धा ३८, यवतमाळ ३९ -

Web Title: The temperature will increased in the state, the highest temperature recorded in Yavatmal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.