राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 05:08 AM2017-09-19T05:08:49+5:302017-09-19T05:08:51+5:30

देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत.

Take action on unregistered drivers - Notice of Transport Commissioner's Office | राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

राज्यात अपघातांचा ‘आलेख’ चढाच!, नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करा-परिवहन आयुक्त कार्यालयाची सूचना

googlenewsNext

मुंबई : देशातील रस्ते अपघातात महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक लागतो. वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हरस्पीड वाहन चालवणे ही रस्ते अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वाढती लोकसंख्या आणि रस्त्यांवरील वाढते अपघातसत्र लक्षात घेता राज्यात नियमबाह्य वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाने दिले आहेत. त्याचबरोबर राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावर वाहन तपासणी मोहीम राबवण्याच्या सूचना कार्यालयातून देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय २०१६च्या ताज्या आकडेवारीनुसार, देशातील सर्वाधिक अपघात होणाºया पाच शहरांत महाराष्ट्राचा तिसरा क्रमांक आहे. राज्यात ३९ हजार ८७८ रस्ते अपघातांमध्ये १२ हजार ९३५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वोच्च न्यायालय नियुक्त रस्ता सुरक्षा समितीने दिलेल्या आदेशानुसार आॅगस्ट महिन्यातील कारवाई आवश्यक त्या वेगाने झालेली नाही, अशी माहिती परिवहन कार्यालयातून देण्यात आली. यामुळे १८ ते २२ सप्टेंबर या कालावधीत संपूर्ण राज्यात वाहने आणि वाहन चालक यांची तपासणी करण्याचे आदेश राज्य परिवहन आयुक्त कार्यालयातून देण्यात आले आहेत.
वाहन चालवताना मोबाइलचा वापर करणे आणि ओव्हर स्पीड वाहन चालवणे यामुळे रस्ते अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे अशा कारणांसह अनुज्ञप्ती (लायसन्स) वैधता, विमा प्रमाणपत्र, हेल्मेट न वापरणे, सीटबेल्ट न बांधणे, नियमांनुसार नंबरप्लेट नसणे, मल्टी टोन हॉर्न, दुचाकीवर दोनपेक्षा जास्त प्रवासी बसणे अशा गुन्ह्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाहनांवर उत्पादकाने बसविलेले दिवे बदलून प्रखर दिवे बसवणा-यांवरदेखील कारवाईचा बडगा उगारण्यात यावा; त्याचबरोबर राज्यातील राष्ट्रीय व राज्य महामार्गांवर वाहन तपासणी मोहीम राबवावी, अशा सूचना संबंधिताना देण्यात आल्या आहेत.
>अपघाती मृत्यूची टॉप पाच राज्ये
राज्ये अपघाती
मृत्यूंची संख्या
उत्तर प्रदेश १९,३२०
तामिळनाडू १७,२१८
महाराष्ट्र १२,९३५
कर्नाटक ११,१३३
राजस्थान १०,४६५

Web Title: Take action on unregistered drivers - Notice of Transport Commissioner's Office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.