शिक्षक रागावल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 06:09 AM2018-02-23T06:09:00+5:302018-02-23T06:09:03+5:30

शिक्षक रागावल्याने अमन समुद्रे (१६, रा. लातूर) या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यात गंभीर जखमी झालेल्या अमनचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला.

Student commits suicide due to resentment | शिक्षक रागावल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

शिक्षक रागावल्याने विद्यार्थ्याने केली आत्महत्या

Next

लातूर : शिक्षक रागावल्याने अमन समुद्रे (१६, रा. लातूर) या विद्यार्थ्याने अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. यात गंभीर जखमी झालेल्या अमनचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकावर बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंदविण्यात आला.
अमन हा शहरातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत होता. १४ फेब्रुवारी रोजी शाळेमध्ये स्वयंशासन दिनाचा कार्यक्रम होता. तेव्हा अमन विशिष्ट पेहराव घालून आला होता. तेव पाहून शिक्षक संतोष आळंदकर त्याला रागावले. हा अपमान सहन न झाल्याने अमनने १६ फेब्रुवारी रोजी घरात अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेतले. त्यात तो गंभीर भाजला. १७ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्याला मृत्यू झाला.

Web Title: Student commits suicide due to resentment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.