नाशिकमध्ये दमदार; नगरला ४ तालुक्यांत अतिवृष्टी, गंगापूर धरणातून विसर्ग : पानशेत, वरसगाव धरणे भरली, पाण्याचा प्रश्न निकाली निघणार  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2017 05:09 AM2017-08-21T05:09:24+5:302017-08-21T05:09:28+5:30

राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून पुणे, नाशिक, नगरला धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस होत आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरत आली आहेत. नाशिकला गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.

 Strong in Nashik; Nagarlal 4 talukasanti highway, Gangapur dam uppermost: Panshet, Varasgaon dam full, water question will be removed | नाशिकमध्ये दमदार; नगरला ४ तालुक्यांत अतिवृष्टी, गंगापूर धरणातून विसर्ग : पानशेत, वरसगाव धरणे भरली, पाण्याचा प्रश्न निकाली निघणार  

नाशिकमध्ये दमदार; नगरला ४ तालुक्यांत अतिवृष्टी, गंगापूर धरणातून विसर्ग : पानशेत, वरसगाव धरणे भरली, पाण्याचा प्रश्न निकाली निघणार  

Next

नाशिक/पुणे/अहमदनगर /औरंगाबाद : राज्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला असून पुणे, नाशिक, नगरला धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस होत आहे. पुणे, नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य धरणे भरत आली आहेत. नाशिकला गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झाला आहे. नगरला चार तालुक्यांत अतिवृष्टी झाल्याने पाण्याचा प्रश्न निकाली निघणार आहे.
पुणे जिल्ह्यात डिंभे धरणातून १५ हजार ५१८, चासकमान धरणातून १२ हजार ८९६ क्युसेक्सने नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस खडकवासला (९३ मिमी) धरण क्षेत्रात झाला. या प्रकल्पात ८५.४२ टक्के साठा झाला आहे. पानशेत, वरसगाव धरणे जवळपास भरली आहेत. नीरा खोºयातील भाटघर, नीरा देवघर आणि वीर आणि गुंजवणी धरण क्षेत्रातही चांगला पाऊस झाला आहे. पवना धरण व मावळातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.
नाशिकला ‘दम’धार
नाशिक जिल्ह्यात इगतपुरी व त्र्यंबके श्वर तालुक्यांमध्ये सर्वाधिक पाऊस झाला. सुमारे तीन आठवड्यांनंतर पावसाने ‘दम’धार हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून सातत्याने हजारो क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
गौतमी, काश्यपी, आळंदीसह गंगापूर धरणाच्या जलसाठ्यात वाढ झाली आहे. गोदावरीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांत सतर्कतेचा इशारा दिला आहे.
पश्चिम विदर्भात पावसाची तूट
विदर्भात पावसाने विश्रांती घेतली आहे. पश्चिम विदर्भात अकोला (३२%), वाशिम (२४%), अमरावती (३९%) तर यवतमाळमध्ये (३५%) पावसाची तूट कायम आहे.
मराठवाड्यात पाणीसाठ्यात वाढ
नांदेडला पाणी पुरवठा करणाºया विष्णुपुरी प्रकल्पातील साठ्यात मोठी वाढ झाली. जायकवाडी धरणात दोन दिवसांत २२.६० द.ल.घ.मी. आवक झाली आहे. परभणीतील लेंडी नदीला पूर आल्याने पाच व धामोडी नदीला पूर आल्याने आठ गावांचा संपर्क तुटला होता. नांदेड महापालिका आयुक्त व अतिरिक्त जिल्हाधिकाºयांच्या घरात पाणी घुसले.

Web Title:  Strong in Nashik; Nagarlal 4 talukasanti highway, Gangapur dam uppermost: Panshet, Varasgaon dam full, water question will be removed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.