हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2018 03:50 AM2018-07-19T03:50:43+5:302018-07-19T03:52:42+5:30

राज्यात दुधाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे. शांतपणे आंदोलन करणा-या शेतक-यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत.

Strict action against the people of the violence, the Chief Minister explained | हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

हिंसाचार करणाऱ्यांवर कडक कारवाई, मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Next

नागपूर : राज्यात दुधाच्या प्रश्नावरून आंदोलन सुरू आहे. शांतपणे आंदोलन करणा-या शेतक-यांवर गुन्हे दाखल केले जाणार नाहीत. केले असतील तर ते परतही घेतले जातील. मात्र, आंदोलनाआड हिंसाचार करणा-यांवर कडक कारवाई केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेते विखे पाटील यांनी राज्यात दूध उत्पादक शेतकºयांचे आंदोलन सुरू असल्याचे सांगत आंदोलक शेतक-यांवर पोलीस कलम १५१ (३) नुसार स्थानबद्धतेचे गुन्हे दाखल केले जात असल्याचे सांगितले. न्यायासाठी आंदोलन करणा-या शेतक-याला दडपण्याचा प्रकार सुरू असून संबंधित गुन्हे मागे घेण्याची मागणी त्यांनी केली. यावर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही ठिकाणी टँकर जाळले जात आहेत. जाळपोळ करणारे निश्चितच शेतकरी नाहीत.

Web Title: Strict action against the people of the violence, the Chief Minister explained

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.