दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 11:35 AM2019-06-19T11:35:31+5:302019-06-19T11:35:48+5:30

सन २०१९-२० हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष आहे.

Statue of Lokmanya in Delhi's Maharashtra Sadan: Mukta Tilak | दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक 

दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात लोकमान्यांचा पुतळा : मुक्ता टिळक 

Next
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी दिली मान्यता

पुणे: दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात आता स्वातंत्र्य सेनानी लोकमान्य टिळकांचा पुतळा राज्यशासनाकडून लवकरच बसविण्यात येणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मान्यता दिली असल्याची माहिती महापौर मुक्ता टिळक यांनी दिली.
दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात लोकमान्य टिळकांचा पुतळा बसविण्यात आलेला नाही.  लोकमान्य टिळकांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदान लक्षात घेता त्यांचा पुतळा या ठिकणी बसविण्यात यावा अशी मागणी महापौर मुक्ता टिळक यांच्यासह अनेक स्वयंसेवी संस्थांनी पत्र पाठवून  यमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बाबत मागणी  केली होती. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत हा पुतळा बसविण्यास  मान्यता दिली असून त्यासाठीच्या खर्चाला देखील वित्त विभागाने मान्यता दिली असल्याचे टिळक यांनी सांगितले.  जुलै महिन्यात हा पुतळा बसविण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. 
दरम्यान सन २०१९-२० हे लोकमान्य टिळकांचे स्मृती शताब्दी वर्ष असून, या निमित्त दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे टिळकांचा पुतळा बसविण्यात येत आहे. याबाबत विविध संस्थांनी मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला याचा आनंद असल्याचे मुक्ता टिळक यांनी सांगितले.

Web Title: Statue of Lokmanya in Delhi's Maharashtra Sadan: Mukta Tilak

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.