सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पुण्यात रविवारी समारोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:22 PM2017-07-21T13:22:29+5:302017-07-21T13:22:29+5:30

राज्यभर चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचा दौऱ्याचा समारोप २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता मार्केटयार्ड इथे होणार आहे.

Statewide tour of Steering Committee concludes on Sunday in Pune | सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पुण्यात रविवारी समारोप

सुकाणू समितीच्या राज्यव्यापी दौऱ्याचा पुण्यात रविवारी समारोप

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 21-  राज्यभर चालू असलेल्या शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीचा दौऱ्याचा समारोप २३ जुलै रोजी दुपारी २ वाजता मार्केटयार्ड इथे होणार आहे. शेतकऱ्यांच्या अत्यंत ज्वलंत प्रश्नावर संप घडवून आणला आणि सरकारला शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करण्यास भाग पाडलं, परंतु शासनाने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला. कर्ज माफीसाठी अटी लावल्या म्हणून हा शेवटचा एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे. जर या शेवटच्या सभेचा आढावा सरकारने घेतला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत, असं समितीने शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले आहे.अजित अभ्यंकर, सुभाष वारे, रवी रणशिंग, अमोल वाघमारे, संतोष शिंदे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. 
 
रविवारी पुण्यातील मार्केटयार्ड इथे होणाऱ्या सभेला मार्गदर्शन करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, खासदार राजू शेट्टी, रघुनाथ पाटील, आमदार बच्चू कडू, जयंत पाटील, अजित नवले, प्रतिभा शिंदे उपस्थित राहणार आहेत.
आणखी वाचा
सुकाणू समितीत फूट पाडण्याचा प्रयत्न
 
 
 
 
10 जुलै रोजी नाशिक येथे भव्य एल्गार सभा घेऊन या सुकाणू समितीने जनजागरण यात्रेची सुरुवात केली. सुकाणू समितीमध्ये सामील असलेल्या सर्व प्रमुख संघटना या यात्रेत सामील झाल्या. शेतकरी संप व आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतक-यांना सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. प्रत्यक्षात मात्र अत्यंत जाचक अटी लावण्यात आल्या. केवळ थकबाकीदार शेतक-यांचेच कर्ज माफ करण्याची भूमिका घेण्यात आली. कर्जमाफी रकमेसाठी दीड लाखाची मर्यादा लावण्यात आली. थकीततेसाठी 30 जून 2017 ची अट घालण्यात आली. नियमित कर्ज भरणा-या शेतक-यांना वा-यावर सोडण्यात आले. पॉलीहाउस, सिंचन, शेडनेट, इमूपालन आदींसाठी घेतलेल्या कर्जांना कर्जमाफीतून वगळण्यात आले. चुकीच्या व फसवणूक करणा-या आकड्यांच्या आधारे जनतेची दिशाभूल करण्यात आली. वारंवार शासनादेश काढून व भूमिका बदलून कर्जमाफीचा पोरखेळ केला गेला. शेतक-यांच्या जखमांवर मीठ चोळणारी विधाने करण्यात आली. शेतकरी समुदायामध्ये सरकारच्या या सर्व विश्वासघाता विरोधात अत्यंत संतापाची भावना आहे. जनजागरण यात्रेत शेतक-यांच्या मनातील या भावना समजून घेऊन लढ्याची पुढील रणनीती ठरविली जाणार आहे.
 
शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रमुख शेतकरी संघटना एकत्र आल्या आहेत. शेतकरी संघटनांची ही एकजूट जनजागरण यात्रेच्या माध्यमातून जिल्हा व गाव स्तरावर घेऊन जाण्याचा प्रयत्न या यात्रेत होणार आहे. शेतक-यांची तरुण पिढी या आंदोलनाचे गावोगाव नेतृत्व करत होती. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी होऊ नयेत यासाठी त्यांच्या शेतीमालाला रास्त भाव मिळण्याची नितांत गरज आहे. शेतीमालाला भाव मिळावा व शेतक-यांच्या निव्वळ उत्पन्नात वाढ व्हावी यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.  
 
नाशिक येथून दिनांक 10 जुलै रोजी सुरु होणारी जनजागरण यात्रा ठाणे (पालघर), रायगड (रत्नागिरी, सिंधुदुर्ग), अहमदनगर, धुळे (नंदुरबार, जळगाव), अमरावती (यवतमाळ), बुलढाणा (अकोला,वाशीम), वर्धा (नागपूर,चंद्रपूर,गडचिरोली, भंडारा, गोंदिया), नांदेड , परभणी (हिंगोली, औरंगाबाद, जालना), बीड (लातूर), सोलापूर (उस्मानाबाद), कोल्हापूर, सांगली मार्गे झाली असून पुणे येथे दिनांक २३ जुलै रोजी यात्रेचा समारोप होणार आहे.
 
 प्रमुख मागण्या
१. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा
२.शेतीमालाला हमीभाव द्या
३.स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीची अंमलबजावणी करा
४.शेतकऱ्यांचे संपूर्ण वीजबिल माफ करा.
५.शेतकऱ्यांना ६० वर्ष वयानंतर किमान ३००० रु.पेन्शन द्या.
६.गायीच्या दुधाला किमान ५० रु. म्हशीच्या दुधाला ६५ रु. हमीभाव द्या
७.शेतकऱ्यांना मुलाना मोफत शिक्षण द्या.
 

 

Web Title: Statewide tour of Steering Committee concludes on Sunday in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.