राज्य सरकारकडून ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 08:37 PM2018-10-31T20:37:34+5:302018-10-31T20:42:48+5:30

दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत. 

The state government announced drought in these 'talukas' | राज्य सरकारकडून ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर 

राज्य सरकारकडून ‘या’ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर 

Next

मुंबई : खरिप हंगामातील पीक नुकसानीचे ‘ऑन द स्पॉट’ अहवाल प्राप्त झाल्यानंतर कोणत्या पिकांचे किती नुकसान झाले हे निश्चित होईल. तसेच, बागायती व जिरायती शेतीतील पिकांच्या नुकसानीची वर्गवारीही समोर येईल. दुष्काळग्रस्तांना अर्थसहाय्याच्या निकषांनुसार हेक्टरी मदत जाहीर केली जाईल. एक महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करुन मदतीचा मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न असेल. गंभीर व मध्यम दुष्काळी अशा दोन्ही भागांत अर्थसहाय्य दिले जाईल.
दुष्काळी तालुक्यांमध्ये सर्वाधिक तालुके हे मराठवाड्यातील आहेत. त्या खालोखाल उत्तर महाराष्ट्र व विदर्भातील तालुके आहेत. 

गंभीर स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके....
सांगली - जत, कवठे महांकाळ, खानापूर, विटा, आटपाडी, तासगाव.
सातारा- माण-दहिवडी,
सोलापूर - करमाळा, माढा, माळशिरस, मंगळवेढे, पंढरपूर, सांगोले, अक्कलकोट, मोहोळ, दक्षिण सोलापूर.
पालघर - पालघर, तलासरी, विक्रमगड.
धुळे - धुळे, सिंदखेडा.
जळगाव - अमळनेर, भडगाव, भुसावळ, बोदवड, चाळीसगाव, चोपडा, जळगाव, जामनेर, मुक्ताईनगर, पाचोरा, पारोळा, रावेर, यावल.
नंदुरबार - नंदुरबार, नवापूर, शहादा.
नाशिक - बागलाण, मालेगाव, नांदगाव, सिन्नर.
अहमदनगर - कर्जत, अहमदनगर, नेवासा, पारनेर, पाथर्डी, राहाता, राहुरी, संगमनेर, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड.
औरंगाबाद - औरंगाबाद, गंगापूर, खुलताबाद, पैठण, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, वैजापूर, कन्नड.
बीड - आष्टी, बीड, धारूर, गेवराई, माजलगाव, शिरूर (कासार), वडवणी, आंबेजोगाई, केज, परळी, पाटोदा.
जालना - अंबड, बदनापूर, भोकरदन, घनसावंगी, जाफराबाद, जालना, परतूर.
नांदेड - मुखेड, देगलूर.
उस्मानाबाद - लोहारा, कळंब, उस्मानाबाद, परांडा, तुळजापूर, वाशी, भूम.
परभणी, मानवत, पाथरी, सोनपेठ, पालम, परभणी, सेलू.
हिंगोली - हिंगोली, सेनगाव.
अमरावती - मोर्शी.
बुलडाणा - खामगाव, नांदुरा, संग्रामपूर, शेगाव, मलकापूर, सिंदखेड राजा, लोणार.
यवतमाळ - बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव.
चंद्रपूर - चिमूर.
नागपूर - काटोल, कळमेश्वर.

मध्यम स्वरुपाचा दुष्काळ असलेले तालुके..
पुणे - आंबेगाव, पुरंदर सासवड, वेल्हे, बारामती, दौंड, इंदापूर, शिरूर-घोडनदी.
सातारा - कोरेगाव, फलटण.
धुळे - शिरपूर.
नंदुरबार - तळोदे
नाशिक - देवळा, इगतपुरी, नाशिक, चांदवड.
नांदेड - उमरी.
हिंगोली - कळमनुरी.
लातूर - शिरूर अनंतपाळ.
अकोला - बाळापूर, बार्शीटाकळी, मुर्तिजापूर, तेल्हारा, अकोला.
अमरावती - अचलपूर, चिखलदरा, वरुड, अंजनगाव सुर्जी.
बुलडाणा - मोताळा.
वाशिम - रिसोड.
यवतमाळ - केळापूर, मारेगाव, यवतमाळ.
चंद्रपूर - ब्रह्मपुरी, नागभीड, राजुरा, सिंदेवाही.
नागपूर - नरखेड.
वर्धा - आष्टी, कारंजा.

Web Title: The state government announced drought in these 'talukas'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.