पर्यावरणपूरक इमारतींसाठी राज्याचा करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2018 04:23 AM2018-05-12T04:23:30+5:302018-05-12T04:23:30+5:30

राज्य शासनाच्या सर्व इमारती पर्यावरणपूरक बांधण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक करार आज करण्यात आला

State contract for eco-friendly buildings | पर्यावरणपूरक इमारतींसाठी राज्याचा करार

पर्यावरणपूरक इमारतींसाठी राज्याचा करार

Next

मुंबई : राज्य शासनाच्या सर्व इमारती पर्यावरणपूरक बांधण्याच्या दृष्टीने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी एक करार आज करण्यात आला. राज्य शासन आणि केंद्र सरकारअंतर्गतची ग्रिहा कौन्सिल यांच्यात सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मुख्य उपस्थितीत हा करार झाला. सचिव (बांधकामे) अजित सगणे आणि ग्रीहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठ यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. या वेळी प्रधान सचिव आशिष कुमार सिंह, सचिव (रस्ते) सी.पी. जोशी आदी उपस्थित होते.
हरित इमारतींच्या बांधकामामुळे जागतिक तपमानवाढीला कारणीभूत पर्यावरणास हानी पोहोचविणाºया वायूंचे उत्सर्जन कमी होण्यास मदत होईल. सर्व शासकीय इमारती पर्यावरणपूरक पद्धतीने कमीतकमी विजेचा वापर, नैसर्गिक प्रकाश आणि हवा आदींचा उपयोग करून अपारंपरिक ऊर्जेचा केला जाईल़

Web Title: State contract for eco-friendly buildings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.