राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 01:17 AM2019-05-18T01:17:59+5:302019-05-18T01:18:14+5:30

बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत.

 State Co-operative Bank will grow business - Vidyadhar Anaskar | राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

राज्य सहकारी बँक व्यवसायवृद्धी करणार - विद्याधर अनास्कर

Next

मुंबई : राज्य सहकारी बँकेच्या निव्वळ नफ्यामध्ये झालेली वाढ आणि अनुत्पादक कर्जाचे ढोबळ प्रमाण ७.३५ व निव्वळ प्रमाण १.१५ टक्के एवढे राखण्यात आलेले यश यामुळे आता राज्य बँक नवीन व्यवसायात पदार्पण करण्यासोबतच काही बँकांचे विलीनीकरण करुन स्वत:चा व्यवसाय वाढविण्याच्या विचारात आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
वर्धा, नागपूर, बुलडाणा या तीन जिल्हा बँका बंद न करता त्यांना काही प्रमाणात टक्केवारी देऊन राज्य बँक व ग्रामीण पतपुरवठा करणाऱ्या संस्थांमध्ये मध्यस्थ म्हणून ठेवावे आणि त्या बँकांचा तोटा दूर झाल्यानंतर त्यांना पुन्हा व्यवस्थीत चालवावे अशी राज्य बँकेची भूमिका असल्याचे अनास्कर म्हणाले.
बँकेने या तीन वर्षात एकही सहकारी साखर कारखाना विकलेला नाही, तर काही कारखाने करारावर चालवायला दिले आहेत. बँकींग करुन बँक फायद्यात आणल्याचे ते म्हणाले. नोटबंदीच्या काळात जिल्हा बँकेकडे जवळपास ४०० ते ५०० कोटी रुपये अडकले आहेत, पण न्यायालयाच्या निर्णयामुळे ती रक्कम आम्ही खर्चात किंवा तोट्यात धरलेली नाही, असेही ते म्हणाले.
राज्य बँकेचा स्वनिधी ४००४ कोटी एवढा झाला असून सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य सरकारकडून मिळणाºया थकहमीचे १०४९ कोटी रुपये मिळाले की बँकेचा स्वनिधी ५०५२ कोटी पर्यंत जाईल, तो महाराष्टÑ बँकेपेक्षा जास्त आहे. त्यामुळे राज्य बँकेने व्यापारी बँकांच्या समवेत सहभाग कर्ज योजनेत सामिल होण्याचा निर्णय घेतल्याची माहितीही अनास्कर यांनी दिली.

Web Title:  State Co-operative Bank will grow business - Vidyadhar Anaskar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :bankबँक