मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकावर फेरिवाल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट; डोंबिवलीतील रोजचंच मरण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2017 03:28 PM2017-09-29T15:28:27+5:302017-09-29T15:29:16+5:30

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते.

The situation is even worse due to the central railway crowded; Dosabivli's daily death | मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकावर फेरिवाल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट; डोंबिवलीतील रोजचंच मरण

मध्य रेल्वेच्या गर्दीच्या स्थानकावर फेरिवाल्यांमुळे परिस्थिती आणखी बिकट; डोंबिवलीतील रोजचंच मरण

Next
ठळक मुद्देमध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. पादचारी पुलावरुन बाहेरील बाजुला पूर्व आणि पश्चिमेकडे जेव्हा प्रवासी बाहेर येतात त्या ठिकाणी फेरिवाल्यांनी जागा अडवलेली असते.

- अनिकेत घमंडी

डोंबिवली- मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या डोंबिवली रेल्वे स्थानकात कल्याण दिशेकडील पादचारी पुलावर प्रचंड गर्दी होते. विशेषत: फलाट क्रमांक १, ३,४, ५ या ठिकाणी अप-डाऊनच्या जलद आणि धीम्या गतीच्या फलाटावर एकाचवेळी लोकल आली की पादचारी पुलावर चेंगराचेंगरी होते. पादचारी पुलावरुन बाहेरील बाजुला पूर्व आणि पश्चिमेकडे जेव्हा प्रवासी बाहेर येतात त्या ठिकाणी फेरिवाल्यांनी जागा अडवलेली असते. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते, कोंडी होते. चेंगराचेंगरी होते. अबालवृद्ध गरोदर मातांना मार्ग काढतांना त्रास होतो. यासंदर्भात प्रवासी संघटनांनी वेळोवेळी स्थानक प्रशासन आणि लोहमार्ग पोलीसांना सतर्क केले आहे. पण तरीही फारसा तोडगा निघत नाही.

आधीच पादचारी पुलाची रुंदी तीन दशकांपासून आहे तेवढीच असल्याने कोंडीत भर पडते. त्यातच रेल्वे हद्दीतील पुलावर फेरिवाले बसतात, सुरक्षा रक्षक त्यांना हटकवण्याचे नाटक करतात. अनेकदा चिरिमिरीसाठी हा दिखावा असल्याचा आरोप प्रवासी करतात. दोन्ही दिशेकडील स्कायवॉकवर बाहेर पडण्यासाठी फेरिवाल्यांचेच अडथळे असतात. त्यामुळे समस्या तीव्र प्रमाणात भेडसावते. मधल्या पुलावरुन येणे फारसे प्रवासी पसंत करत नाहीत. तो पुल लांब पडतो, त्यातच मानपाडा मार्गावर जाण्यासाठी पाटकर रोड, केळकर रोड आदी मार्गावरुन रिक्षा सहज मिळतात. त्यामुळे कल्याण दिशेकडील जुन्या पादचारी पुलावरुनच जाणे पसंत करतात. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर आरपीएफ आणि लोहमार्ग पोलीस सुरक्षा रक्षक ठेवतात, पण ती सुविधा तोकडी असते. नावाला असते. अल्पावधीतच ती सुविधा बंद केली जाते, पुन्हा ओरडा झाला की स्थिती जैसे थे होते. ही शोकांतिका असल्याचे प्रवासी सांगतात.

- ठाकुर्ली रेल्वे स्थानकात पूर्वेकडील मुंबईच्या दिशेने असलेल्या पादचारी पुलाच्या पाय-यांची जागा ही अरुंद आहे. एकावेळी केवळ एकच व्यक्ति सुटसुटीतपणे जाऊ शकेल एवढीच जागा तेथे आहे. पण त्यासंदर्भात रेल्वे प्रशासन कानाडोळा करत आहे. त्यासाठी स्थानकाचे रिमॉडेलींग झाले तेव्हा तातडीने या पाय-यांची रुंदी वाढवावी असे आवाहन करण्यात आले होते. पण त्याकडे सोयीस्कररित्या कानाडोळा का करण्यात आला. ब्रीजवरुन जाण्यापेक्षा असंख्य प्रवासी हे रेल्वे फाटक बंद असतांनाही जीव धोक्यात घालत रुळ ओलांडत ये-जा करतात. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांचे हाल, बळीच हवे आहेत का? असा सवाल संतप्त प्रवाशांनी केला.

- दिवा स्थानकात देखिल मुंबई मार्गावरील पादचारी पूलाचे पूर्वेकडे जेथे लॅडींग होते, ते लॅडींग होत असतांना प्रवाशांच्या दुतर्फा गर्दीने कोंडी होते. गेल्याच आठवड्यात प्रचंड पाऊस पडला तेव्हा देखिल ही समस्या भेडसावली होती. प्रवासी तेथे ताटकळले, गर्दी झाली होती. तेव्हा चेंगराचेंगरी झाली होती. प्रत्यक्षदर्शींनी यासंदर्भात प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. आदेश भगत यांना कळवले, त्यांनी आरपीएफ, लोहमार्ग पोलीसांना कळवले. पण ही स्थिती का यावी, पोलीस तेथे असायलाच हवे. गर्दीच्या वेळात तरी सुविधा हवीच अशी अपेक्षा दिव्यातील प्रवाशांनी केली.

- आसनगाव स्थानकातही सध्याचा पादचारी पूल हा अरुंद असून तेथेही लोकल आली की गर्दी वाढते. त्याचा त्रास प्रवाशांना होतो. तेथे आवश्यक त्या उपाययोजना व्हायला हव्यात त्या का केल्या जात नाहीत, असा टाहो प्रवाशांनी व्यक्त केला.

Web Title: The situation is even worse due to the central railway crowded; Dosabivli's daily death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.