थोडक्यात हुकलो साहेब.... लोकसभा निवडणुकातील निसटते 'जय-पराजय'

By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2019 06:17 AM2019-04-04T06:17:00+5:302019-04-04T06:23:18+5:30

अपक्षांचा खेळ चाले; फक्त १३ झाले खासदार, पण अनेकांना केले पराभूत !

In short, Hukklo ray ... Jai-Parajay in the Lok Sabha elections | थोडक्यात हुकलो साहेब.... लोकसभा निवडणुकातील निसटते 'जय-पराजय'

थोडक्यात हुकलो साहेब.... लोकसभा निवडणुकातील निसटते 'जय-पराजय'

Next


प्रेमदास राठोड

कोणत्याही निवडणुकीत अनेक अपक्ष स्पर्धेतील उमेदवारांचा खेळ करतात. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकाही यास अपवाद नाहीत. आजवरच्या १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून ३ हजार ९७९ अपक्षांनी भाग्य अजमावले. त्यांनी २ कोटी ५१ लाख मते (६.५५ टक्के) घेतली. एकूण १३ अपक्ष लोकसभेत पोहोचले, ६२ जणांनी अनामत रक्कम राखली, तर ११९ जणांना १० टक्क्यांवर मते मिळाली. उर्वरित ३ हजार ८६० अपक्षांना धड १० टक्के मतेही मिळाली नाहीत. १६ पैकी ८ निवडणुकांमध्ये एकाही अपक्षाला यश मिळाले नाही. गेल्या २०१४ च्या निवडणुकीत तर महाराष्ट्रात सर्व ४४६ अपक्षांची अनामत जप्त झाली. आजवरच्या निवडणुकीत ५० जणांनी दुसऱ्या स्थानापर्यंत धडक दिली. १८४ जण तिसऱ्या स्थानावर होते. ३१९ जण चौथ्या स्थानापर्यंत पोहोचले तर ३२२ पाचव्या क्रमांक होते. आजवरच्या निवडणुकीत सर्वाधिक ६० उमेदवार १९९६ च्या निवडणुकीत नागपुरात उभे होते. त्यात ४६ अपक्ष होते. त्यावेळी पहिले ३ वगळता उर्वरित ५७ जणांना धड एक टक्काही मते मिळाली नव्हती. आजवरच्या निवडणुकीत दारून पराभव पत्करलेल्या अनेक अपक्षांनी अनेकांचे खेळ मात्र अगदी सहजपणे बिघडवले.

विजयी झालेले १३ अपक्ष: सदाशिवराव मंडलिक (कोल्हापूर, २००९), रामदास आठवले (पंढरपूर, १९९९), मोरेश्वर सावे (औरंगाबाद, १९८९), अशोक देशमुख (परभणी, १९८९), वामनराव महाडिक (मुंबई दक्षिण-मध्य, १९८९), दत्ता सामंत (मुंबई दक्षिण-मध्य, १९८४), के.एम. कौशिक (चंद्रपूर, १९६७), लाल शमशाह (चंद्रपूर, १९६२), बापूजी अणे (नागपूर, १९६२), बापू कांबळे (कोपरगाव, १९५७), रघुनाथ खाडिलकर (अहमदनगर, १९५७), जयवंत मोरे (सोलापूर, १९५७) आणि बाळासाहेब खर्डेकर (कोल्हापूर कम सातारा, १९५१).
पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत महाराष्ट्रात अपक्षांचे प्रमाण २२ टक्के होते. पुढे १९८४ मध्ये ते चक्क ७६ टक्क्क््यांवर पोहोचले. त्यावेळी ४९८ उमेदवारांपैकी ३७७ अपक्ष होते. नंतरच्या दोन निवडणुकांमध्ये अपक्षांचे प्रमाण कमी झाले. पण १९९६ मध्ये पुन्हा एकदा ते ७६ टक्क्क््यांवर पोहोचले. त्यावेळी राज्यात आजवरचे सर्वाधिक एकूण १०६४ उमेदवार रिंगणात होते. १९६२ नंतर अपक्षांचे सर्वांत कमी प्रमाण १९९९ मध्ये ३० टक्के होते. २०१४ मध्ये रिंगणातील ८९७ पैकी ४४४ उमेदवार अपक्ष होते.

आजवर केवळ अपक्षांमुळे निवडणुकीत पराभूत झालेल्यांची संख्या मोठी आहे. यात काही निसटता पराभव पाहिलेल्या अनेक दिग्गजांचा समावेश आहे. सुभाष वानखेडे (हिंगोली २०१४), सुनील तटकरे (रायगड, २०१४), किरीट सोमय्या (मुंबई उत्तर पूर्व, २००९), डॉ. कल्याण काळे (औरंगाबाद, २००९), प्रफुल्ल पटेल (भंडारा, २००४), लक्ष्णराव ढोबळे (उस्मानाबाद, २००४), उज्ज्वाताई सुशीलकुमार शिंदे (सोलापूर, २००४), पांडुरंग फुंडकर (अकोला, १९९९), गुरुदास कामत (मुंबई उत्तर पूर्व, १९९९), हंसराज अहिर (चंद्रपूर, १९९९), अनंत तरे (कुलाबा, १९९६), दादासाहेब रुपवते (मुंबई दक्षिण-मध्य, १९९१), उत्तमराव राठोड (हिंगोली, १९९१), शरद दिघे (मुंबई उत्तर-मध्य, १९८९), प्र.के. अत्रे (मुंबई मध्य, १९६७). हे सर्व जेवढ्या मतांनी पराभूत झाले, त्यापेक्षा जास्त मते त्यावेळी अपक्षांनी घेतली होती.
गेल्या निवडणुकीत हिंगोलीत राजीव सातव १६३२ मतांनी विजयी झाले. यापेक्षा जास्त मते त्यावेळी रिंगणातील १० अपक्षांनी घेतली होती. रायगडात गेल्यावेळी सर्व पराभूत उमेदवारांना विजयी अनंत गीता यांच्या मताधिक्यापेक्षा जास्त मते होती.



गेल्या निवडणुकीत (२०१४) हिंगोलीत काँग्रेसचे राजीव सातव यांचा १६३२ एवढ्या मतांनी निसटता विजय झाला होता. रायगडातून जिंकलेले अनंत गीते यांचे मताधिक्य २११० एवढे अत्यल्प होते.

Web Title: In short, Hukklo ray ... Jai-Parajay in the Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.