शिवसेना आमचे ‘टार्गेट’ नाही

By admin | Published: September 29, 2014 12:23 AM2014-09-29T00:23:27+5:302014-09-29T00:23:27+5:30

शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपावर शरसंधान केल्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात आमचे मुख्य ‘टार्गेट’

Shivsena is not our 'target' | शिवसेना आमचे ‘टार्गेट’ नाही

शिवसेना आमचे ‘टार्गेट’ नाही

Next

भाजपाची सडेतोड भूमिका : शिवसेना स्पर्धेतही नाही
नागपूर : शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी भाजपावर शरसंधान केल्यावर भाजपाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते. मात्र, निवडणुकीच्या रिंगणात आमचे मुख्य ‘टार्गेट’ कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस असून शिवसेना आमच्या स्पर्धेत नाहीच. त्यांच्या टीकेला उत्तर द्यायला वेळदेखील नाही, असे प्रत्युत्तर देऊन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव यांच्या टीकेला पक्षाने फारसे गंभीरतेने घेतले नसल्याचे सूतोवाच केले.
केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना त्यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली. या विधानसभा निवडणुकांमध्ये भाषा, प्रांत, धर्म, संप्रदाय हा मुद्दाच नाही. सुशासन व विकास याच मुद्यावर जनता मतदान करेल आणि राज्यातील ‘व्हिलन’ कोण हे जनताच ठरवेल. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला सत्तेवरून दूर करुन सुशासन प्रस्थापित करणे हे आमचे लक्ष्य आहे असे ते म्हणाले.
बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नेत्या सुलेखा कुंभारे यांनी यावेळी भाजपाला पाठिंब्याची घोषणा केली.
आगे आगे देखिए होता है क्या
शिवसेनेसोबत युती तोडल्यानंतर आता वेगळ्या विदर्भाबाबत भाजपाची भूमिका काय याकडे विदर्भवाद्यांचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी लहान राज्यांबाबत भाजपा सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले. लहान राज्यांची संकल्पना भाजपाने स्वीकारली आहे. परंतु नवीन लहान राज्ये निर्माण करताना दोन्ही राज्यांना योग्य सन्मान देण्याची गरज आहे. तसेच त्यांना समृद्ध करण्यासाठी योग्य आराखडादेखील असणे आवश्यक आहे. कॉंग्रेसने तेलंगणाच्या निर्मितीच्यावेळी नेमकी हीच चूक केली, असा टोला त्यांनी लगावला. वेगळा विदर्भ नेमका कधी करणार या प्रश्नावर ‘आगे आगे देखिए होता है क्या’ असे उत्तर त्यांनी दिले.

Web Title: Shivsena is not our 'target'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.