अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2023 12:26 PM2023-09-05T12:26:33+5:302023-09-05T12:28:56+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण त्यांना OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भुमिका भाजपची आहे. - आशिष देशमुख

Sharad Pawar's plan to trap Ajit pawar in trouble to return back NCP; Ashish Deshmukh's big claim on the Maratha community lathicharge | अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा

अजितदादांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव; मराठा समाजावरून देशमुखांचा मोठा दावा

googlenewsNext

मराठा समाजाच्या आंदोलकांवरी लाठीमारावरून भाजपाच्या आशिष देशमुखांनी वेगळाच संशय व्यक्त केला आहे. मराठा समाजाला सोबत घेऊन अजित पवारांना अडचणीत अडकविण्याचा शरद पवारांचा डाव असल्याचा आरोप देशमुखांनी केला आहे. 

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, पण त्यांना OBC मधून नव्हे तर वेगळे आरक्षण दिले पाहिजे, अशी भुमिका भाजपची आहे. मराठा समाजाला घेऊन अजित पवार यांना अडचणीत अडकवून पुन्हा आपल्या पक्षात परत आणण्याचा डाव शरद पवार यांचा आहे, असा आरोप देशमुख यांनी केला आहे.

ओबीसीची टक्केवारी कमी होता नये, यासाठी एकटे वडेट्टीवारच नाही, आम्ही सर्व ओबीसी नेते त्यांच्यासोबत उभे आहोत. पण मराठा समाजाला पण आरक्षण देण्यात यावे, कारण की त्यांना पण गरज आहे. मराठा समाज फडणवीसांवर विश्वास ठेवतो. जेव्हा फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा मराठा समाजाला आरक्षण मिळाले होते आणि महाविकास आघाडीच्या सरकारने ही केस व्यवस्थित हाताळली नाही म्हणून सुप्रीम कोर्टात ती टिकू शकले नाही, अशी टीका देशमुख यांनी केली. 

नार्को टेस्ट करायची असेल तर अनिल देशमुख यांनी नार्को टेस्ट करावी. त्यांनीच गृह मंत्रालयावर खोटे आरोप केले आहेतय अनिल देशमुख यांनी महाराष्ट्राची आणि मराठा समाजाची माफी मागावी अशी माझी मागणी आहे, असे देशमुख म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar's plan to trap Ajit pawar in trouble to return back NCP; Ashish Deshmukh's big claim on the Maratha community lathicharge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.