सॅटीस छतावरून कलगीतुरा सुरू

By admin | Published: July 26, 2014 10:56 PM2014-07-26T22:56:57+5:302014-07-26T22:56:57+5:30

सॅटीसवर छत बसवण्याचा नारळ अखेर उद्या फुटणार असला तरीसुद्धा यानिमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तो फुटण्याआधीच श्रेय घेण्याची चढाई सुरू झाली आहे.

Satisfaction starts from the ceiling | सॅटीस छतावरून कलगीतुरा सुरू

सॅटीस छतावरून कलगीतुरा सुरू

Next
अजित मांडके ञ ठाणो
सॅटीसवर छत बसवण्याचा नारळ अखेर उद्या फुटणार असला तरीसुद्धा यानिमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये तो फुटण्याआधीच श्रेय घेण्याची चढाई सुरू झाली आहे. प्रयत्न आम्ही केले आणि श्रेय राष्ट्रवादीवाले कसे घेतात, असा सवाल शिवसेनेने उपस्थित केला आहे. दुसरीकडे या छताच्या खर्चावरून वादंग निर्माण होण्याची चिन्हे निर्माण झाली असून छताऐवजी त्याठिकाणी सौरऊर्जा पॅनल उभारावे, अशी मागणी जनमोर्चा या संस्थेने पालिका आयुक्तांकडे केली आहे. 
येत्या काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. त्यामुळे आता झालेल्या आणि होऊ घातलेल्या कामांचे श्रेय घेण्यासाठी ठाण्यात लोकशाही आघाडी आणि शिवसेनेत कलगीतुरा रंगला आहे. काही दिवसांपूर्वी कापूरबावडी उड्डाणपुलाच्या एका मार्गिकेचा शुभारंभ शिवसेनेने स्टंट करून केला होता. परंतु, त्यानंतर आपल्या कामाचे श्रेय जाते की काय, असे लोकशाही आघाडीला वाटल्याने दोनच दिवसांत या मार्गिकेचा पुन्हा शुभारंभ करून ज्याने जे काम केले आहे, त्याचे त्याला श्रेय घेऊ द्या, असे सांगून त्यांनी या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, आता ठाणो स्टेशनवर उभारण्यात आलेल्या सॅटीस प्रकल्पावर छत उभारण्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी पुन्हा आमने-सामने आले आहेत. सॅटीसवर छत उभारले जावे, यासाठी रेल्वेकडे वारंवार पत्रव्यवहार केला असल्याचा दावा शिवसेनेने केला आहे. तसेच पालिकेत या कामाचा प्रस्तावसुद्धा मंजूर करून घेतला. त्यामुळे याचे श्रेय आम्हालाच मिळाले पाहिजे, असा दावा शिवसेनेच्या नेते मंडळींनी केला. 
या प्रकल्पांतर्गत परिवहन सेवेच्या बसेससाठी रेल्वे स्थानकासमोर 15क्क् चौमी क्षेत्रचा प्लॅटफॉर्म व रेल्वेचे पादचारी पूल यांना जोडणारा सुमारे 12क्क् चौमी क्षेत्रचा कॉन्कोर्स एरिया तयार करण्यात आला. या प्रकल्पासाठी सुरुवातीला 19.5क् कोटींचा निधी मंजूर केला होता. परंतु, प्रत्यक्षात यासाठी 35.5क् कोटी इतका खर्च झाला. पालिकेने वाढीव 14.18 कोटींचा खर्च या प्रकल्पावर आधीच करून ठाणोकरांच्या पैशांचा चुराडा केला आहे. त्यातही हा प्रकल्प तयार झाल्यानंतर वाहतूककोंडी कमी होण्याऐवजी काहीशी वाढलेलीच आहे. यानिमित्ताने शिवसेना आणि राष्ट्रवादीची मंडळी एकाच छताखाली येणार आहेत. त्यामुळे येथेसुद्धा श्रेयाचे राजकारण रंगणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
 
सॅटीस परिसरातील ध्वनी आणि वायू प्रदूषण पूर्वीपेक्षा अधिकच वाढल्याचे पर्यावरण अहवालात  स्पष्ट झाले आहे. त्यात पुलावर दरवर्षी पडणा:या खड्डय़ांवर पालिका लाखो रुपयांचा खर्च करीत आहे. मूळ प्रस्तावात अस्तित्वातील बस डेकवर आधारासाठीचे स्तंभ उभारून त्यावर संरचनात्मक पोलाद व पीव्हीसी पॉलिस्टर टेन्साइल फॅब्रिक वापरून छत उभारण्याचे प्रस्तावित होते.
 
सॅटिसच्या कामास प्रशासकीय मान्यता प्राप्त झाल्यावर त्यासाठी संरचनात्मक संकल्पाबाबत ठाणो रेल्वे स्थानक परिसर वाहतूक योजना प्रकल्पातील पुलाचे संरचना सल्लागार यांच्यामार्फत संपूर्ण संकल्पचित्रची छाननी करून अभिप्राय घेण्यात आले. त्यानुसार, छतासाठीचे स्तंभ अस्तित्वातील बस डेकवर उभारणो तांत्रिकदृष्टय़ा योग्य नसल्याचा अहवाल तज्ज्ञ सल्लागारांकडून प्राप्त झाला आहे.
 
च्आता स्तंभ पायासह जमिनीवरून उभारणो आवश्यक झाले आहे. मूळ प्रस्तावात छताच्या पायासाठी येणा:या खर्चाचा समावेश नसल्याने सुधारित अंदाजपत्रकानुसार कामाच्या खर्चात वाढ झाली आहे. 
च्आता यावर आणखी खर्च न करता त्या ठिकाणी कायमस्वरूपी डेकवर छत टाकण्याऐवजी संकल्पचित्रत प्रस्तावित केल्यानुसार डेकच्या खालच्या पातळीपासून सहा ते सात मीटरवर सौरऊर्जाचे पॅनल्स बसवण्यात यावेत, अशी मागणी जनमोर्चा संस्थेचे संयोजक चंद्रहास तावडे यांनी पालिका आयुक्त असीम गुप्ता यांच्याकडे केली आहे. 
च्या सौरऊज्रेच्या पॅनलमुळे निर्माण होणा:या विजेचा वापर पुलावर व खालीसुद्धा केला जाऊ शकतो. तसेच याचा खर्चसुद्धा कमी आहे. त्यामुळे छताच्या प्रस्तावाचा फेरविचार व्हावा, अशी मागणीसुद्धा त्यांनी केली आहे.
 

 

Web Title: Satisfaction starts from the ceiling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.