सरपंच, ग्रा. पं. सदस्यांचे मानधन लवकरच वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 12:31 AM2018-09-20T00:31:46+5:302018-09-20T06:48:55+5:30

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर आता शासनाने सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा बैठक भत्ता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

Sarpanch, G. Pt Members will soon be honored | सरपंच, ग्रा. पं. सदस्यांचे मानधन लवकरच वाढणार

सरपंच, ग्रा. पं. सदस्यांचे मानधन लवकरच वाढणार

Next

- समीर देशपांडे

कोल्हापूर : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागल्यानंतर आता शासनाने सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा बैठक भत्ता वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

ग्रामविकास विभागाने १८ सप्टेंबर २०१८ रोजी परिपत्रक काढून एप्रिल २०१८ ते सप्टेंबर २०१८ या सहा महिन्यांसाठी वाढीव रकमेनुसार सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचा भत्ता किती होतो याची आकडेवारी मागविली आहे.

सध्या २००० लोकसंख्येच्या गावच्या सरपंचांना ४०० रुपये, ८००० लोकसंख्येच्या गावांच्या सरपंचांना ६०० आणि त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणाऱ्या गावच्या सरपंचांना ८०० रुपये मासिक मानधन दिले जाते. आता सदस्यांना प्रतिबैठक भत्ता २५ रुपयांवरुन २०० रुपये होईल.

सुधारित मानधन
लोकसंख्या टप्पा       मानधन
० ते २०००                 १०००/-
२००१ ते ८०००           १५००/-
८००१ पेक्षा जास्त       २०००/-
ग्रामपंचायती             २७९३२
सरपंचांची संख्या       २७९३२
सदस्य संख्या          २.३२ लाख

Web Title: Sarpanch, G. Pt Members will soon be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.