लाल परी थांबली ! मराठवाड्यात एसटी कर्मचा-यांच्या संपाला उत्फूर्त प्रतिसाद, प्रवाशांचे प्रचंड हाल तर खाजगी वाहतूक सुसाट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 11:09 AM2017-10-17T11:09:43+5:302017-10-17T17:55:54+5:30

एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला मराठवड्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. विभागातील सर्वच बसस्थानकात बस सेवा बंद असल्याने दिवाळी निम्मित प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत.

Red angel stopped! Responding to the collision of ST employees in Marathwada, huge traffic congestion, private transport | लाल परी थांबली ! मराठवाड्यात एसटी कर्मचा-यांच्या संपाला उत्फूर्त प्रतिसाद, प्रवाशांचे प्रचंड हाल तर खाजगी वाहतूक सुसाट

लाल परी थांबली ! मराठवाड्यात एसटी कर्मचा-यांच्या संपाला उत्फूर्त प्रतिसाद, प्रवाशांचे प्रचंड हाल तर खाजगी वाहतूक सुसाट

googlenewsNext
ठळक मुद्दे बस फे-या रद्द झाल्याने शेकडो  प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबलेखाजगी वाहतूकदारांनी याचा फायदा घेत बस स्थानकाकडे मोर्चा वळवला आहे. 

औरंगाबाद :  एसटी कर्मचारी संघटनांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. या संपाला मराठवड्यात उस्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने पहाटेपासूनच संपाचा परिणाम जाणवला. विभागातील सर्वच बसस्थानकात बस सेवा बंद असल्याने दिवाळी निम्मित प्रवासाला निघालेल्या प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. बस फे-या रद्द झाल्याने शेकडो  प्रवासी तासनतास बसस्थानकात खोळंबले असल्याने खाजगी वाहतूकदारांनी याचा फायदा घेत बस स्थानकाकडे मोर्चा वळवला आहे. 

कर्मचा-यांच्या संपामुळे दिवाळीसाठी गावी जाणा-या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. बस  कधी जाणार? अशी विचारणा करीत प्रवासी एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी गर्दी करीत आहे. यामध्ये ज्येष्ठ प्रवासी, लहान मुले आणि विद्यार्थ्यांचे सर्वाधिक हाल होत आहेत.

काय आहेत मागण्या 
राज्यांच्या महामंडळातील कर्मचार्‍यांपेक्षा कमी पगारी महाराष्ट्र एस.टी.महामंडळातील कर्मचार्‍यांच्या आहेत. त्या धर्तीवर सेवा जेष्ठतेनुसार पदनिहाय वेतनश्रेणी तयार करून एस.टी.कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन द्यावे ही प्रमुख मागणी असून खाजगी गाड्या भाड्याने घेण्याचा निर्णय रद्द करावा, जाचक परिपत्रके रद्द करावेत, चालक कम वाहकांची संकल्पना त्वरीत रद्द करावी, सेवानिवृत्त कर्मचार्‍यांना रूपये 500 भरून वर्षभर मोफत पास द्यावा. तसेच राज्य सरकारप्रमाणे महागाई भत्ता वेळीच द्यावा या संघटनेच्या मागण्या आहेत. या संपास मान्यता प्राप्त एस.टी.कामगार संघटनेसह महाराष्ट्र एस.टी.वर्कर्स कॉग्रेस (इंटक), महाराष्ट्र मोटार कामगार फेडरेशन, कनिष्ठ वेतनश्रेणी कामगार संघटना आदींचा पाठिंबा आहे. 

परळी - 
परळीत बस स्थानकातून रात्री 12  पासून एकही गाडी न सुटल्याने शुकशुकाट. संप 100 टक्के यशस्वी झाल्याचा दावा एसटी कामगार संघटनेचे रमेश गित्ते यांनी केला आहे. मात्र, यामुळे अवैध प्रवासी वाहतूक तेजीत आहे. 

भोकर -
भोकर आगारातील चालक वाहक कामगार मध्यरात्री पासून बेमुदत संपावर गेल्यामुळे मंगळवारी सकाळ पासुन एकही गाडी आगारातून निघाली नाही. कामगार आपल्या मागण्याबाबत ठाम असून  कायम तोडगा निघाल्या शिवाय कामावर जाणार नाही असा पावित्रा घेतला आहे. शेजारील तेलंगणा राज्यातून आलेल्या एसटी बसलाही येथील आंदोलक कामगारांनी माघारी फिरवले आहे. यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांची कोंडी होऊन खाजगी प्रवासी वाहनांचा वापर प्रवाशांना करावा लागत आहे. प्रवाशांच्या गैरसोयीबद्धल आदोलक कर्मचाऱ्यांनी दिलगीर व्यक्त केली आहे. 


कंधार -
आगारातील सुमारे 350 चालक,वाहक,यांत्रीकी आदी कर्मचारी यांनी संपात सहभाग घेतल्याने आगारातुन बस बाहेर पडल्या नाहीत. या संपाने मात्र खाजगी वाहनाची च़ंगळ झाली. 200 पेक्षा अधिक खाजगी वाहनांना हा संप सुगीचा व पर्वणीचा ठरला.

परतूर -
परतूर बस आगारात चालक वाहकांनी मुंडण करून केला शासनाचा निषेध.


पाटोदा -
बस आगारावरात कर्मचा-यांनी संबळ वाजऊन केला सरकार आणि परिवहन मंत्र्यांचा निषेध केला. तब्बल 376 कर्मचा-यांनी संपात सहभागी होत प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला.

Web Title: Red angel stopped! Responding to the collision of ST employees in Marathwada, huge traffic congestion, private transport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.