जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2021 02:29 PM2021-01-21T14:29:05+5:302021-01-21T14:49:54+5:30

जयंत पाटील यांनी नुकतेच एका मुलाखतीत मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त केली होती.

'This' reaction came from Shiv Sena on the wish of Jayant Patil for the post of Chief Minister | जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण...

जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा; शिवसेना म्हणते, ते ज्येष्ठ अन् अनुभवी,पण...

googlenewsNext

पुणे : एका मुलाखतीत जयंत पाटील यांनी नुकतीच 'मलाही मुख्यमंत्री व्हायला आवडेल' ही इच्छा व्यक्त बोलून दाखवली. आता त्या वक्तव्यावर राजकीय क्षेत्रात प्रतिक्रिया उमटायला सुरुवात होऊ लागली आहे. जयंत पाटील यांनी व्यक्त केलेल्या मुख्यमंत्री पदाची इच्छेवर शिवसेनेकडून प्रतिक्रिया आली आहे. 

विधान परिषदेच्या उपसभापती व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी जयंत पाटील यांंच्या मुख्यमंत्री पदाच्या इच्छेवर प्रतिक्रिया देताना त्याांना आपल्या खास शैलीत जोरदार टोला लगावला आहे. 

पुण्यात ज्येष्ठ समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या संपादकत्वाखालील ‘प्रबोधन’ पाक्षिकाच्या शतकोत्सवानिमित्त संवाद पुणे तर्फे प्रबोधन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवाचा उद्घाटन समारंभ गुरुवारी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडला. याप्रसंगी त्या बोलत होत्या. गोऱ्हे म्हणाल्या, म्हणाल्या, 'पाटील अनुभवी आणि ज्येष्ठ नेते आहेत. पदाची आशा बाळगणे हे प्रत्येक नेत्याचे, पक्षाचे काम असते. मात्र, पाटील कोणत्या सालाबद्दल बोलले आहेत, हे त्यांना विचारावे लागेल. 

या कार्यक्रमाला विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्‍हे,  अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव, सुर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे डॉ. संजय चोरडिया आणि सीमा चोरडिया, संवाद पुणेचे सुनील महाजन, सचिन ईटकर, निकिता मोघे, किरण साळी, हरीश केंची आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पदाची इच्छा व्यक्त करताना काय म्हणाले होते जयंत पाटील....

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी  एका मुलाखतीत आमच्या पक्षाकडे (राष्ट्रवादीकडे) अजून मुख्यमंत्रिपद आलेलं नाही असे वक्तव्य केले होते. यावर मुख्यमंत्री होण्याची तुमची इच्छा आहे का असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर पाटील यांनी चौकार लगावताना म्हणाले, मलाही मुख्यमंत्री व्हावं, असे वाटणारच आहे. मात्र अंतिम निर्णय पक्षप्रमुख शरद पवार घेतील. त्याचप्रमाणे मुख्यमंत्रिपद मिळावं ही पक्षातील अनेक नेत्यांची इच्छा असते. माझ्यासोबत मतदारांना देखील आपण मुख्यमंत्री बनावं, अशी इच्छा असेल.

परंतु सध्याची परिस्थिती आणि पक्षाच्या आमदारांची संख्या पाहता हे शक्य नाही. आम्हाला आमदारांची संख्या वाढवावी, लागेल. पक्ष संघटना मजबूत करावं लागेल, असं जयंत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

Web Title: 'This' reaction came from Shiv Sena on the wish of Jayant Patil for the post of Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.