सावंतवाडी : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपाने ज्या पद्धतीने वागणूक दिली ते बघून मला वाईट वाटतंय, काँग्रेसने नारायण राणें यांना सर्व काही दिले तरी ते काँग्रेस सोडून का गेले हे कोडे न उलगडलेले असल्याचे म्हणत खासदार हुसेन दलवाई यांनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत.

निती आयोगाच्या नावाखाली देशात अनीती सुरू असल्याची टीकाही त्यांनी केलीय. जीएसटीवर बोलताना ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जीएसटी च्या नावाखाली चोरी करण्यास शिकवत आहे. केंद्र सरकार हे अडाणी सरकार असल्याचा घणाघातही यावेळी त्यांनी केला. 

माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना काँग्रेसने सर्व काही दिले असे असताना ही राणे काँग्रेस पक्ष सोडून गेले असतील तर आता खऱ्या अर्थाने काँग्रेसचे शुध्दीकरण झाले अशी टिका गोव्याचे काँग्रेस खासदार शांताराम नाईक यांनी केली ते सावंतवाडी येथे आयोजित काँग्रेस बैठकीत बोलत होते यावेळी खासदार हुसेन दलवाई, जिल्हाध्यक्ष विकास सावंत, नगरसेवक जयेंद्र परुळेकर, माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण, नागेश मोरये, राजू मसूरकर, दादा परब आदी यावेळी उपस्थित होते.