आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो!; उद्धव ठाकरेंचा चिमटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2018 02:59 PM2018-05-06T14:59:05+5:302018-05-06T15:13:06+5:30

नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली.

Rajinikanth is afraid nowadays Modi! | आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो!; उद्धव ठाकरेंचा चिमटा

आजकाल रजनीकांतही मोदींना घाबरतो!; उद्धव ठाकरेंचा चिमटा

Next
ठळक मुद्देउध्दव ठाकरे यांची गुगली: मोदींना सांगा विदर्भात समुद्र देतील

संजय पाठक


नाशिक- पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले तर ते विदर्भात पाच मिनीटात समुद्र आणून देतील...अलिकडे रजनीकांतही मोंदीना घाबरतो..अशा शब्दात शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी नाणार प्रकल्पावरून पंतप्रधान मोंदीची खिल्ली उडवली.


नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीसाठी आलेल्या उध्दव ठाकरे यांनी हॉटेल ताज येथे पत्रकार परिषदेत बोलतांना हे विधान केले. नाणार येथील प्रकल्पाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ठाकरे यांनी नाणार येथील प्रकल्पाची अधिसूचना आम्ही रद्द केल्याने आमच्या दृष्टीने हा विषय संपलेला आहे. मात्र, हा प्रकल्प विदर्भात द्या अशी विदर्भातील भाजपा आमदारांचीच मागणी असून ती योग्यही आहे. विदर्भाचा विकास करण्याची केवळ भाषा करून चालणार नाही. तर त्याचा विकासही केला पाहिजे, त्यादृष्टीने तेल शुध्दीकरणाचा प्रकल्प विदर्भात करावा अशी सूचना करताना त्यांनी देशात सात ठिकाणी समुद्र किनारा नसलेल्या ठिकाणी अशाप्रकारचे तेल शुध्दीकरणाचे कारखाने आहेत. मग, हा कोकणवासियांचा विरोध असेल तर विदर्भात हा प्रकल्प करण्याची मागणी पूर्ण करण्यास हरकत काय, या प्रकल्पासाठी समुद्र किनाºयाचीच गरज असते, असे जर मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर मोदींना सांगा ते पाच मिनीटात समुद्र आणतील असे ठाकरे म्हणाले. अलिकडे रजनीकांतही मोदींना घाबरतो असे मिश्कीपणे ते म्हणाले अर्थात हे गंमतीने घ्या नाही तर माझ्यात आणि रजनीकांतमध्ये अकारण वाद लागून जाईल असेही ते म्हणाले.

स्वबळाचा नारा कायम
आगामी विधानसभा निवडणूका शिवसेना स्वबळावर लढविणार असून पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारीणीने त्याबाबत निर्णय घेतला आहे त्यात बदल केला जाणार नाही. शिवसेना भाजपा स्वतंत्र निवडणूक लढविणार असल्याने कॉँग्रेस- राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. पंधरा वर्षे एकमेकांविरूध्द भांडून सत्तेत राहणारे आता एकसंघ निवडणूक लढवायाला निघाले असले तरी गेली ६५ वर्षे कॉँग्रेसची सत्ता होती, पंधरा वर्षे राष्ट्रवादी त्यांच्या बरोबर होती. त्यामुळे त्यांचा कारभार कसा आहे, हे सर्वांनाच माहिती असल्याचे ते म्हणाले. त्याच बरोबर विधान परिषद निवडणूकीत सहा पैकी तीन जागांवर कागदारवर शिवसेनेचे सदस्य संख्या बघता निवडून येण्याची शक्यता असल्याने पक्षाने उमेदवार केले आहे. गेली २५ वर्र्षे भाजपाशी युती असल्याने त्याबाबत संभ्रम असणे स्वााभाविक असल्याचे सांगत व्यक्तीगत संबंध, ऋणानुबंध लक्षात घेऊन मते मिळवण्याचा सल्ला आपण विधान परिेदेती उमेदवारांना दिल्याचे ते म्हणाले.

भुजबळ- खडसेंवर बोलले नाहीत..
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना जामिन अर्ज मंजूर झाला. तसेच एकनाथ खडसे यांना भूखंड घोटाळ्यात क्लीन चीट मिळाली यावर उध्दव ठाकरे यांनी बोलण्यास नकार दिला. जे घडले ते सर्वांसमोर आहे त्यात काय वेगळं बोलणार असा प्रश्नही त्यांनी केला.

Web Title: Rajinikanth is afraid nowadays Modi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.