रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 03:46 AM2017-10-12T03:46:47+5:302017-10-12T03:47:08+5:30

दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांच्या (डीआरएम) दौºयात बुधवारी व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन प्रवाशांना घडले.

 Railway official's VIP! Types in Aurangabad: Use of special inspection bogs to not order | रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर

रेल्वे अधिका-याचा ‘व्हीआयपी’ थाट! औरंगाबादमधील प्रकार : आदेश नसल्याचे सांगत विशेष निरीक्षण बोगीचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापकांच्या (डीआरएम) दौºयात बुधवारी व्हीआयपी संस्कृतीचे दर्शन प्रवाशांना घडले. अधिका-यांनी प्रवाशांमध्ये मिसळावे, असे आदेश असताना सोयी-सुविधांनी सज्ज अशा निरीक्षण बोगीतून डीआरएम औरंगाबादेत दाखल झाले.
‘दमरे’च्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक डॉ. ए. के. सिन्हा येणार म्हणून दुपारी दीड वाजेपासून रेल्वेचे स्थानिक अधिकारी प्लॅटफॉर्म क्रमांक एकच्या शेवटच्या टोकाला उभे होते. दुपारी दोन वाजेच्या सुमारास सचखंड एक्स्प्रेस रेल्वेस्टेशनवर दाखल झाली. तिच्या शेवटी लावलेल्या निरीक्षण बोगीत (यान) डॉ. सिन्हा होते.
डॉ. सिन्हा रेल्वे गार्ड आणि चालकांच्या क्रू रेस्ट रूमची पाहणी करण्यासाठी औरंगाबादला आले होते; परंतु रेल्वेस्टेशनवर दाखल झाल्यानंतर बोगीतून लगेच बाहेर पडून क्रू रेस्ट रूम गाठण्याचे त्यांनी टाळले. प्लॅटफॉर्म एकवरून त्यांची बोगी इंजिन लावून प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर नेण्यात आली. त्यामुळे स्थानिक अधिकाºयांची चांगलीच धावपळ झाली.
रेल्वेला विशेष बोगी जोडण्यासाठी किमान ३० ते ४० हजार रुपयांचा खर्च येतो. अधिकाºयांसाठी जोडलेल्या बोगीत सोयी-सुविधांवरही खर्च केला जातो.

Web Title:  Railway official's VIP! Types in Aurangabad: Use of special inspection bogs to not order

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.