वाशिंद रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको; दादर-अमृतसर एक्स्प्रेस 35 मिनिटं धरली रोखून

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2017 08:36 AM2017-09-01T08:36:24+5:302017-09-01T11:23:18+5:30

रेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत.

Rail passenger trains in Vasind railway station; Hold the Dadar and Amritsar Express | वाशिंद रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको; दादर-अमृतसर एक्स्प्रेस 35 मिनिटं धरली रोखून

वाशिंद रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांचा रेलरोको; दादर-अमृतसर एक्स्प्रेस 35 मिनिटं धरली रोखून

Next
ठळक मुद्देरेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. शुक्रवारी सकाळी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झालेला पाहायला मिळतो आहे.संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेलरोको केल्याची माहिती मिळते आहे.

मुंबई, दि. 1- नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मंगळवारी रुळावरूंन घसरल्याची घटना आसनगाव स्थानकाजवळ घडली होती. 72 तासांपासून टिटवाळा-आसनगाव रेल्वेसेवा बंद आहे. रेल्वे सेवा ठप्प असल्याने चाकरमान्यांचे मात्र चांगलेच हाल होत आहेत. कसारा, आसनगावमध्ये राहणाऱ्या चाकरमान्यांना मुंबईत कामावर हजर राहणं शक्य होत नाहीये. याकारणामुळे शुक्रवारी सकाळी रेल्वे प्रवाशांचा उद्रेक झालेला पाहायला मिळाला. संतापलेल्या कर्मचाऱ्यांनी वाशिंद रेल्वे स्थानकात रेलरोको केला होता. पण काही वेळानंतर हा रेलरोको मागे घेण्यात आला आहे. पोलिसांनी आता आदोलनकर्त्या प्रवाशांता रेल्वे रूळावरून बाजूला केल्याची माहिती मिळते आहे. वाशिंद स्टेशनवर संतप्त प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्सप्रेस तब्बल 35 मिनिटं रोखून धरली होती. तसंच रेल्वे सेवा कधी पूर्वपदावर येणार? अशी विचारणा काही प्रवाशांनी स्टेशन मास्तरांकडे केली. तीन दिवसांपासून बंद असलेली सेवा पूर्वपदावर यायला अजून आठ दिवस तरी लागतील, असं उत्तर या संतप्त प्रवाशांचा देण्यात आल्याचं समजतं आहे. दरम्यान, लोकलसेवा लवकरात लवकर पूर्ववत करा, अशी मागणी रेलरोको करणाऱ्या प्रवाशांकडून केली जाते आहे. 

सध्या कसारा ते टिटवाळा हा मार्ग बंद असला तरी टिटवाळ्याहून कसाराकडे जाणारा मार्ग सुरु आहे. या मार्गावर लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जात असून प्रवाशांच्या सोयीसाठी या एक्स्प्रेसना प्रत्येक स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. मात्र मुंबईकडे येण्यासाठी पर्याय नसल्याने प्रवाशांमध्ये असंतोष आहे. 

नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेस मंगळवारी रुळावरूंन घसरल्याची घटना आसनगाव स्थानकाजवळ घडली. यामुळे रेल्वे रूळ आणि ओवरव्हेड वायरचे मोठं नुकसान झालं. रुळांवर मोठय़ा प्रमाणात चिखल आल्याचे पाहून गाडीच्या लोको पायलटने एमजर्न्‍सी ब्रेक लावला व त्यामुळे मोठा अपघात टळल्याचेदेखील ते म्हणाले. बुधवारी रात्री डाऊन मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. पण अप मार्गावर सतत चिखल येत असून या मार्गावरील वाहतुक सुरू करण्यासाठी दोन दिवसांचा तरी कालावधी लागणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. पण तीन उलटूनही लोकलसेवा सुरू न झाल्याने संतप्त प्रवाशांनी शुक्रवारी सकाळी रेलरोको केला आहे.  

दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल ट्रेनची वाहतूक बंद आहे. या मार्गावर सध्या टिटवाळापर्यंतच लोकल ट्रेन सुरु आहेत. मंगळवारी सकाळी आसनगाव- वाशिंददरम्यान नागपूर- मुंबई दुरांतो एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरले होते. त्यामुळे कसारा- टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प झाली. त्यापाठोपाठ मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वे खोळंबली.
टिटवाळा- कसारा मार्गावर रेल्वेच्या पथकाला अपघातग्रस्त दुरांतो एक्स्प्रेसचे डबे हटवण्यात यश आलं होतं. ३६ तासांच्या अथक प्रयत्नानंतर हे डबे हटवण्यात आलं. डबे हटवण्यात आले असले तरी या मार्गावर अजूनही ओव्हरहेड वायर आणि अन्य तांत्रिक कामे बाकी आहेत. त्यामुळे गुरुवारी सकाळीदेखील टिटवाळा- कसारा मार्गावरील लोकल सेवा बंद होती. वाहतूक ठप्प असल्याने कसारा, आसनगाव येथे राहणाऱ्या प्रवाशांचे हाल होत आहेत.

Web Title: Rail passenger trains in Vasind railway station; Hold the Dadar and Amritsar Express

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.