राफेल, एफ १६ विमानांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके: एअरो इंडियाचे थाटात उद्घाटन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2019 07:04 PM2019-02-20T19:04:44+5:302019-02-20T19:20:57+5:30

राफेल लढाऊ विमाने आणि अमेरिकेच्या एफ १६ फायटर विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी बेंगळुरू येथील १२ व्या एअरो इंडियाचा पहिला देवास चांगलाच गाजवला.

Rafael, F16 aircraft horibble experiments : Inauguration of Aero India | राफेल, एफ १६ विमानांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके: एअरो इंडियाचे थाटात उद्घाटन

राफेल, एफ १६ विमानांचे चित्तथरारक प्रात्यक्षिके: एअरो इंडियाचे थाटात उद्घाटन

googlenewsNext
ठळक मुद्दे देशी- विदेशी विमानांनी गाजवला एअर शो भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी आपली उपयुक्तता सिद्ध तेजस, सुखोई ३० आणि मिराज २००० च्या वैमानिकांनी साहिल गांधी यांना वाहिली श्रद्धांजलीव्हिंटेज विमाने ठरली आकर्षण 

निनाद देशमुख 
बंगळुरू :  गेल्या अनेक दिवसांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या फ्रान्सच्या दसाल्ट एरोस्पेस एजन्सीच्या राफेल लढाऊ विमाने आणि अमेरिकेच्या एफ १६ फायटर विमानांच्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांनी बेंगळुरू येथील १२ व्या एअरो इंडियाचा पहिला देवास चांगलाच गाजवला. ध्वनी पेक्षा जास्त वेगाने आकाशात उंच झेप घेत त्याच वेगाने खाली येत अचानक वर जात अनेक चित्तथरारक कवायती करत संपूर्ण जगात असलेली या विमानाची ख्याती सिद्ध केली. या विमानाच्या दोन्ही वैमानिकांनी उपस्थित दर्शकांशी संवाद साधत आपल्या कसरती सादर केल्या. या बरोबरच सुखोई ३०, भारतीय बनावटीचे तेजस हलके लढाऊ विमान, सारंग हेलिकॉप्टर च्या पथकाने आकाशात केलेली विविध फॉर्मेशन देशी विदेशी कंपन्यांच्या प्रतिनिधींचे आकर्षण ठरले. 
      बेंगळुरू येथील हवाई दलाच्या एलहांका विमानतळावर १२ एअरो इंडिया या प्रदर्शनाचे संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री सुरेश प्रभू, रक्षा राज्य मंत्री सुरेश भामरे, कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी, लष्कर प्रमुख जनरल बिपीन रावत, हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बिरेंद्र सिंग धानोआ, नौदल प्रमुख अ‍ॅडमिरल सुनील लांबा, संरक्षण सचिव संजय मित्रा, संरक्षण उत्पादन विभागाचे सचिव अजय कुमार तसेच विविध देशातील राजदूत तसेच संरक्षण क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्तित होते. सुरुवातीला हवाई दलाच्या हेलिकॉप्टरांनी सलामी देत एअरो इंडिया प्रदर्शनाला सुरुवात केली. यानंतर सुखोई ३०, मिराज २०००, मिग २९, या विमानांची विविध फॉर्मशन सादर करत एअर शो ला सुरुवात केली. सुरवातीला सारंग हेलिकॉप्टरच्या पथकांनी आकाशात उंच झेप घेत विविध कसरती सादर केल्या. 
नेत्र पोरमेशन, डायमंड फॉर्मेशन, याबरोबरच एकमेकांच्या जवळून जात उपस्तितांच्या अंगावर शहा आणले. या पथकाचे नेतृत्व मराठमोळे विंग कमांडर सचिन गद्रे, विंग कमांडर स्नेहा कुलकर्णी, तसेच विंग कमांडर आदित्य पवार यांनी केले. एचएएल निंर्मित लाईट युटिलिटी हेलिकॉप्टर, एएलएच एमके द्रुव्ह यांनी भारतीय लष्कर, नौदल आणि हवाई दलासाठी आपली उपयुक्तता सिद्ध केली. हवेत समतोल साधत विविध कसरती या हेलिकॉप्टरच्या पायलटने दाखवत भारतीय अभियंत्याच्या निर्मितीची क्षमता सिद्ध केली. 
यानंतर भारतीय बनावटीच्या तेजस या हलक्या लढाऊ विमानाची अतिउच्च गतिशीलता, तसेच आवाजाच्या वेगाने जात अनेक कसरती सादर केल्या. यावेळी उपस्थितांनी टाळ्या वाजवून दाद दिली. यानंतर गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले फ्रान्सचे राफेल विमानाने आकाशात उंच भरारी घेत कसरती सादर करण्यास सुरुवात केली. यावेळी वैमानिकाने उपस्त्रोतांना नमस्ते म्हणत सवार्ना अभिवादन  केले. यानंतर विशेष फॉर्मेशन करत सूर्यकिरण अपघात दुर्दैवी मृत्युमुखी पडलेले विंग कमांडर साहिल गांधी  यांना श्रद्धांजली वाहिली. 
क्षणात उंच आकाशात झेप, कसरती करताना वेगाने वळत दाखवलेली चपळता, नाकाच्या दिशेत उंच झेपावत लगेच जमिनीच्या दिशेने येत हवेत गिरक्या घेत या विमानाने ककसरती सादर करत सर्वांच्या अपेक्षा पूर्ण केल्या. यानंतर अमेरीकीच्या एफ १६ या विमानाने  वेगाने येत चपळता दाखवत कसरती सादर करत सर्वांची मने जिंकली. 
.........................
तेजस, सुखोई ३० आणि मिराज २००० च्या वैमानिकांनी साहिल गांधी यांना वाहिली श्रद्धांजली
एयर शोच्या सुरुवाला तेजस, सुखोई ३० आणि मिराज २००० या तिन्ही विमानही मिसिंग फॉर्मेशन सादर करात मंगळवारी सूर्यकिरण एअरो ब्याटीक विमानांना झालेल्या अपघातात मृत्यमुखी पडलेल्या विंग कमांडर साहिल गांधी यांना आगळी वेगळी श्रद्धाजंली अर्पण केली. चार विमानांच्या फॉर्मेशन मध्ये एक जागा रिकामी ठेवत या तिन्ही विमानांनी आकाशात उड्डाण घेतले. उपस्थित सर्वांनी उभे राहत साहिल गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. 

व्हिंटेज विमाने ठरली आकर्षण 
यावर्षी प्रथमच दुसऱ्या महायुद्धात नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या आणि काश्मीर मुक्ती संग्रामात भारतीय सैन्याला कुशलतेने शत्रूच्या मध्ये उतरवत काश्मीर खोरे वाचविण्यात महत्वाची कामगिरी करणारी डकोटा विमानांचे उड्डाण आणि अमेरिकन बनावटीची बी ५२ बॉम्बर हि व्हिंटेज विमाने या वर्षीच्या एअर शो ची आकर्षण ठरले

Web Title: Rafael, F16 aircraft horibble experiments : Inauguration of Aero India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.