पुणे - ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव, मृतदेह पाऊणतास रस्त्यावरच पडून

By admin | Published: June 25, 2016 03:42 PM2016-06-25T15:42:07+5:302016-06-25T15:42:07+5:30

बसला ओव्हरटेक करत असताना दुभाजक आणि पीएमपी बसच्यामध्ये आल्यानंतर धक्का लागून खाली पडलेल्या तरुणाच्या डोक्यावरुन बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला

Pune - In the absence of overtaking, youth lost their lives, dead bodies fell on the road to gain weight | पुणे - ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव, मृतदेह पाऊणतास रस्त्यावरच पडून

पुणे - ओव्हरटेक करण्याच्या नादात तरुणाने गमावला जीव, मृतदेह पाऊणतास रस्त्यावरच पडून

Next
>ऑनलाइन लोकमत - 
पुणे, दि. 25 - बसला ओव्हरटेक करत असण्याचा प्रयत्न करत असताना झालेल्या अपघातात तरुणाला जीव गमवावा लागला आहे. बसला ओव्हरटेक करत असताना दुभाजक आणि पीएमपी बसच्यामध्ये आल्यानंतर धक्का लागून खाली पडलेल्या तरुणाच्या डोक्यावरुन बसचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. शुक्रवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास अभिनव कला महाविद्यालय चौकामध्ये हा अपघात झाला. स्वारगेट पोलिसांनी पीएमपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 
 
सोहम सुहास भुंजे (वय २५, रा. कर्वेनगर, मुळ - सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आह. तर अभिजीत रामचंद्र अभिनभावी (रा. ताकारी, ता. वाळवा जि. सांगली) हा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी विशाल प्रभाकर सुतार (वय ३३, रा. सुतारवाडी, कासार आंबोली, ता. मुळशी) यांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी सोहम आणि अभिजित दुचाकीवरून टिळक रस्त्यावरून स्वारगेटच्या दिशेने जात होते. अभिनव कला महाविद्यालय पुरम चौकातून जात असताना सोहम आणि अभिजीतने बसला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. 
 
बस आणि डिव्हायडरच्या मध्ये कमी जागा शिल्लक असल्यामुळे दुचाकी जागेवरच थांबवली. त्यावेळी बसचा बाहेर आलेला पत्रा दुचाकीला अडकला. त्यामुळे हे दोघेही खाली पडले. काही कळायच्या आतच सोहमच्या डोक्यावरुन बसचे चाक गेले. तर अभिजीत जखमी झाला. अपघातानंतर मृतदेह सुमारे अर्धा ते पाऊण तास रस्त्यावरच पडुन होता. या अपघातामुळे टिळक रस्ता, सारसबाग परिसरासत वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी चालकाला अटक केली असून याप्रकरणी सोहमचा चुलतभाऊ हर्षद भुंजे (वय २७, रा. कात्रज) यांनी फिर्याद दिली आहे.
 

Web Title: Pune - In the absence of overtaking, youth lost their lives, dead bodies fell on the road to gain weight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.